मुंबई : कोरोना काळात प्रत्येकाला इम्युनिटी किती गरजेची असते हे समजलं. यावेळी मात्र बाजारात इम्युनिटी वाढवण्यासाठ अनेक औषधंही आली. जेव्हा शरीरावर बाहेरून कोणत्या व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा इम्युन सिस्टिम हा हल्ला रोखण्याचं काम करते. परंतु काहीवेळा ही प्रतिकारशक्ती उलट काम करण्यास सुरवात करते आणि स्वतःच्या पेशींना मारते. याला ऑटोइम्युन डिसीज (autoimmune disease) असं म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑटोइम्युन डिसीजचे अनेक प्रकार आहेत. टाइप -1 मधुमेहाप्रमाणे एक ऑटोइम्युन डिसीज आहे. तसंच, संधिवात, सोरायसिस, मल्टिपल स्क्लेरोसिस, एडिसन रोग, ग्रेव्ह्स रोग इत्यादी हे ऑटोइम्युन डिसीज प्रकार आहेत. आजाराच्या तीव्रतेनुसार ऑटोइम्यून रोग धोकादायक असल्याचं सिद्ध होऊ शकतं.


ऑटोइम्युन डिसीजची लक्षणं


ऑटोइम्युन डिसीजची लक्षणं भिन्न आहेत. काही लक्षणं ऑटोइम्युन डिसीजमध्ये सारखी असू शकतात जसं की सांधेदुखी आणि सूज, थकवा, ताप, पुरळ, अस्वस्थता इत्यादी.. याशिवाय, त्वचेचा लालसरपणा, सौम्य ताप, लक्ष न लागणं, हात थरथरणं अशी लक्षणं दिसून येतात. 


या व्यक्तींना अधिक धोका


ज्या लोकांच्या कुटुंबात हा त्रासाचे ग्रस्त असलेल्या व्यक्ती आहे, त्यांना या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. म्हणजेच आनुवंशिकता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा ऑटोइम्युन डिसीज असेल तर तुम्हालाही हा त्रास होऊ शकतो. या समस्येचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो.