केवळ पाणी पिऊनंही कमी होऊ शकतं तुमचं वजन, कसं... जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला पाणी तुमचं वजन कसं कमी करू शकतं याबद्दल सांगणार आहोत.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेकजण ना-ना पद्धतींचा वापर करतात. यावेळी काही जणं आहारामध्ये बदल करतात. तर काही जीम किंवा व्यायाम करून वजन कमी करण्यावर भर देतात. मात्र तुम्हाला माहितीये का केवळ पाणी पिण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
होय, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला महागडे उपचार घेण्याची किंवा खाणेपिणं कमी करण्यासाठी गरज नाही. केवळ पाण्याने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता. ते कसं काय? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला पाणी तुमचं वजन कसं कमी करू शकतं याबद्दल सांगणार आहोत.
असा करा पाण्याचा वापर?
पाण्याचं सेवन केल्याने चयापचयच म्हणजेच मेटाबॉलिज्म तर सुधारतं. शिवाय यामुळे शरीराची ऊर्जा पातळी देखील वाढवण्यास मदत होते. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित झाल्याने वजन सहज कमी होण्यास मदत होते.
पुरुषांनी दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्यायला हवं तर, महिलांनी किमान 2 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. तसंच जर एखाद्या व्यक्तीने जेवण करण्यापूर्वी पाण्याचे सेवन केलं तर ते कॅलरीज कमी करण्यास मदत होऊ शकते.
जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास भूक नियंत्रित राहते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण जात नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
वजन कमी करण्यासाठी असं प्या पाणी
वजन कमी करण्यासाठी हलकं कोमट पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्याच्या मदतीने अन्नाचं सहज पचन होतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, तहान लागल्यावरच पाणी प्या आणि एक घोट किंवा दोन घोट पाण्याने तहान भागवू नका. यावेळी भरपूर पाणी प्या. जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर याचा अर्थ तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या आहे.
(टीप : बातमीमध्ये दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ज्ञांचं मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)