मुंबई : शरीराच्या प्रत्येक भागाचे स्वतःचं असं महत्त्व असतं. ज्याशिवाय तुमचं सौंदर्य आणि आकर्षण कमी होऊ शकते. यामधील चेहऱ्याचा एक भाग म्हणजे ओठ. धूम्रपान, अयोग्य आहार, रासायनिक पदार्थांनी भरलेले ब्युटी प्रोडक्ट्स यांच्यामुळे ओठांचा रंग असामान्य होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही सोप्या आणि घरगुती उपायांच्या मदतीने ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग मिळवू शकता. ओठांना गुलाबी बनवण्याच्या या काही टीप्स खूप प्रभावी ठरू शकतात.


मऊमऊ गुलाबी ओठांसाठी काही खास टीप्स


  • जेव्हा शरीराचा कोणताही भाग त्याचा नैसर्गिक ओलावा गमावू लागतो, त्यावेळी त्याचा नैसर्गिक रंग कमी होताना दिसतो. म्हणून, आपण दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. ओठांचा गुलाबी रंग होण्यासाठी पाण्याचे सेवन करणं किती फायदेशीर आहे.

  • ओठ फाटणं किंवा कोरडे होणं हे ओलावा गमावण्याची मुख्य चिन्हं आहेत. आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात ते ओठांचा रंगावर परिणाम करतं. यासाठी नक्कीच ओठांवर लिप बाम लावावा. यामुळे ओठांमध्ये ओलावा टिकून राहतो.

  • ओठांवर लिपस्टीक लावण्यापूर्वी लिप बामचा वापर करावा. यामुळे ओठांवर थर निर्माण होतो ज्यामुळे लिपस्टिकच्या केमिकल्सचा ओठांवर अधिक परिणाम होत नाही. आणि ओठांचं सौंदर्य टिकून राहतं 

  • शरीराच्या इतर भागांपेक्षा ओठांना पोषक घटकांची गरज अधिक असते. यासाठी आपल्या आहारात विटामीन सी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे ओठांना ओलावा मिळण्यास मदत होते.

  • ब्युटी प्रोडक्सचा वापर करताना त्यामध्ये केमिकल आहे की नाही याकडे लक्षपूर्वक पाहावं. यासाठी तुम्ही चांगल्या ब्रँडच्या ब्युटी प्रोडक्सची निवड करावी. ज्यामध्ये जोजोबा ऑयल, अनारच्या बियांचं तेल आणि शिया बटर यांचा समावेश असेल.