मुंबई : रोज सकाळी सगळ्यात आधी आहारात आपण एक फळ खायला हवं असं नेहमीच आपल्या घरातील मोठे सांगतात. जर आपल्या त्वचेवर तेज कमी झालं असेल तर आपण व्हिटॅमिन सी असलेली फळं खायला हवी. आज आपण अशाच एका फळाविषयी जाणून घेणार आहोत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी आणि ताप येतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायची असेल तर आपण रोज एक संत्र खायला हवं. (Orange Benefits


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते. संत्र्यात असलेले फायबर आपली पचनशक्ती चांगली ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे आपलं वजनही नियंत्रणात राहतं. 


संत्र्याचं सेवन केल्यानं किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. लघवीमध्ये सायट्रेट नसल्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. सायट्रिक अॅसिड हे संत्र्याच्या रसामध्ये असते.  किडनी स्टोन असलेल्या लोकांनी रोज एक ग्लास संत्र्याचा ज्युस प्यायला हवा. 


आंबट फळ 


संत्र्याचं सेवन केल्यानं स्ट्रोकचा धोका कमी होतो. संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयविकाराच्या वाढीस प्रतिबंध करतात. यासोबतच ब्लड सेल्स चांगल्या राहण्यासही मदत होते.  संत्री केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपली त्वचाही चांगली ठेवते. हे मुरुम, डाग दूर करते आणि त्वचा ग्लोइंग बनवते. (oranges benefits or santara khane che fayde eat daily in winter for vitamin c and weight loss) 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)