मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातवरणात महाराष्ट्रात एका अनोख्या दानयज्ञाचा शुभारंभ झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी 24 तास आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यात अवयवदानाच्या महामोहिमेला मुंबईतल्या सिद्धविनायक मंदिरात सुरूवात झाली. देशात अनेक रुग्ण किडनी, डोळे, त्वचा, यकृत या अवयवांच्या कमतरतेमुळे यातानामय जीवन जगतायत. 


म्हणूनच श्री गणेशाच्या साक्षीनं अवयवदानाचा संकल्प करून शेकडो भाविकांनी शपथ घेतली. गीताचं लोकापर्पण करण्यात आलं. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन,  उपस्थित होते. 


यावेळी शेकडो गणेशभक्तांनी अवयवदानाची शपथ घेतली.. महाराष्ट्राच्या पाच महत्वाच्या शहरांमध्ये झी 24 तास ही महा मोहिम राबवत आहे.