मुंबई : वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. 


कार्बोहायड्रेट्स आवश्यक मात्र ...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला उर्जा मिळते. मात्र वजन आटोक्यात ठेवताना कोणत्या फळाचा कसा समावेश करावा याकरिता  पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, कोणतेही फळ प्रमाणात खाल्ल्यास त्यचा आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. 


कोणती फळं खाल्ल्याने होऊ शकतो त्रास ?  


केळं - 


दूधासोबत केळं खाल्ल्याने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढवणार्‍यांसाठी हा उपाय अधिक फायदेशीर आहे. दूधातून प्रोटीन आणि केळ्यातून शुगरचा पुरवठा होतो. शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढतं. 


सुके जर्दाळू -  


सुके जर्दाळू हे कॅन्डीप्रमाणे असतात. अनेकदा लोकं प्रवासादरम्यान सुके जर्दाळू चघळतात. चविष्ट जर्दाळूंमुळे अनेकजण त्यामधील फ्रुक्टोजचं प्रमाण लक्षात घेत नाहीत. यामुळे वजन वाढू शकते. लठ्ठपणा वाढण्यासाठी प्रमाणापेक्षा अधिक जर्दाळू खाणं त्रासदायक ठरू शकतं. 


द्राक्ष 


द्राक्ष चविष्ट असले आणि एकदा खाल्ले की खातच रहावे असे वाटत असले तरीही यामुळे लठ्ठपणाचा त्रास वाढतो. द्राक्षामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजन वाढू शकतं. 


अननस 


अननस  आरोग्याला फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक अनेक आजारांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी शरीराला मजबूत करण्यास मदत करतात. अननसाच्या अतिसेवनाने वजन वाढते. कॅलरीजचं प्रमाण अधिक असल्यने वजनही वाढते. 


अ‍ॅव्हॅकॅडो 


अ‍ॅव्हॅकॅडो हे परदेशी आणि आरोग्यदायी फळ आजकाल भारतामध्येही प्रसिद्ध आहे. त्याचा आहारात समावेश केल्याने वजन वाढण्यास मदत होते. 


सुकामेवा  


मनुका, बदाम असा सुकामेवा कॅलरीजयुक्त असतो. त्याच्या नियमित अतिसेवनामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. 


नारळ 


नारळामध्ये प्रोटीन घटक मुबलक असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. शरीरात लठ्ठपणाची समस्या वाढते. 


पिच - 


नियमित पिच खाल्ल्याने वजन वाढते. यामध्ये प्रोटीन घटक मुबलक असल्याने वजन वाढते.