मुंबई  :  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने कोरोनाला रोखण्यासाठी लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी लसीची चाचणी सर्वप्रथम छोट्या माकडांवर केली आहे. या चाचणीचा अहवाल बुधवारी जाहीर झाला.  माणसांप्रमाणे प्राण्यांवर करण्यात आलेल्या लस चाचणीचा निष्कर्ष आश्वासक असल्याचं देखील विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली आहे. SARS-CoV-2 या विषाणूमुळे जगात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे SARS-CoV-2 हा डोस सहा माकडांना देण्यात आला. पण ज्या माकडांना कोरोना विषाणूवरील ही लस देण्यात आली त्या माकडांनी न्युमोनियाची बाधा झाली नाही असे डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितले. 


लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यााला मानवी चाचण्या सुरु होणार आहेत. भारतातील पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे.  सध्या जगातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. शिवाय जगभरातील वैज्ञानिक संशोधक कोरोनावर लस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. वैज्ञानिक आणि संशोधक लवकरात लवकर कोरोनावर लस शोधून काढतील अशी अपेक्षा जगातील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे.