पाणीपुरीत टॉयलेट क्लिनर? भैय्याला 6 महिन्यांची शिक्षा
पाणीपुरीमध्ये आरोग्यासाठी हानिकारक असं पाणी मिसळत असल्याच्या अनेक घटना समोर येतात.
मुंबई : पाणीपुरी...असा शब्द जरी कोणी उच्चारला तरीही आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तिखट...मीडियम तर काहींना गोड अशी चमचमीत पाणीपुरी खायला आपल्या प्रत्येकाला आवडतं. पाणीपुरी खायला आवडत नाहीत अशा व्यक्ती फार क्वचित सापडतील. कदाचित तुम्हीही पाणीपुरी लव्हर असाल...असं असेल तर थांबा...कारण पाणीपुरीमध्ये आरोग्यासाठी हानिकारक असं पाणी मिसळत असल्याच्या अनेक घटना समोर येतात.
पाणीपुरीमध्ये टॉयलेट क्लिनर
2017 मध्ये अहमदाबामध्ये एका पाणी पुरीवाल्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अहमदाबादच्या लाल दरवाजा परिसरातील एक विक्रेता पाणीपुरीच्या पाण्याचा स्वाद वाढावा यासाठी त्यामध्ये टॉयलट क्लिनरचा वापर करायचा. याप्रकरणी तो दोषी आढळल्यानंतर त्याला 6 महिन्यांची शिक्षा देण्यात आली.
या विक्रेत्याबाबत तक्रार देण्यात आली होती. यावेळी प्रयोगशाळेच्या चाचणीनंतर जे समोर आलेलं सत्य थक्क करणारं होतं. हा विक्रेता पाणीपुरीच्या पाण्यात अशा पद्धतीचं अॅसिड मिसळायचा जे टॉयलेट क्लिनरमध्ये वापरलं जातं. यामध्ये तो दोषी आढळला आणि त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
पाणीपुरीमध्ये शौचालयाचं पाणी
कोल्हापूरातून ही घटना समोर आली होती. 2020 मध्ये या पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडियो समोर आला होता. यामध्ये हा विक्रेता शौचालयाच्या पाण्याने पाणीपुरीचा मसाला तयार करत असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी हे प्रकरणं पोलिसांपर्यंत गेलं होतं.