Belly fat कमी करण्यासाठी मदत करतील `या` फळाच्या बिया!
या बियांचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
मुंबई : पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित असतीलच, पण पपईच्या बिया देखील फायदेशीर असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? पपईच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळतं, जे शारीरिक कार्य सुधारतात आणि चरबीपासून मुक्त होतात. शिवाय पपईच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
पपईच्या बियांचं सेवन करण्याचे काही फायदे आज आपण जाणून घेऊया. ज्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही पपई खाल्ल्यावर बिया टाकण्यापूर्वी शंभरदा विचार कराल.
पोटाची चरबी
पपईच्या बिया वजनासोबतच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स, खनिजं आणि खूप कमी कॅलरीज असतात. पपईतील एन्झाईम्स केवळ वजन कमी करत नाहीत, तर खराब कोलेस्ट्रॉलही कमी करतात.
यकृत
पपईच्या बिया यकृतासाठी खूप फायदेशीर आहेत. ते लिव्हर सिरोसिसमध्ये फायदेशीर ठरतं. चांगले परिणाम मिळावे यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पपईच्या बियांचं सेवन करा.
पचन प्रक्रिया
पपईच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पाचक एन्झाईम असतात, जे प्रथिनं तोडण्यास मदत करून नैसर्गिक पचन प्रक्रियेत मदत करतात.
पपईच्या बियांचे सेवन कसं करावं?
पपईसोबत तुम्ही त्याच्या बियांचं सेवन करू शकता. पपईतील बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करा. ते सलाड किंवा सूपमध्ये घालून घेऊ शकता. तुम्ही पपईच्या बिया सुकवून त्याची पावडरही बनवू शकता. दिवसभरात फक्त 5 ते 8 ग्रॅम बियांचं सेवन करा.