मुंबईः लहान मुलांनी त्यांच्या पालकांसोबत एकाच बेडवर किंवा वेगळ्या बेडवर झोपणं योग्य आहे का? या प्रश्नावर अनेकदा तुमचा गोंधळ उडाला असावा. आज आम्ही तुमचा गोंधळ दूर करणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लहान मुलांना स्वतःसोबत झोपवणं योग्य आहे की वेगळ्या बेडवर, असा प्रश्न सर्वच पालकांच्या मनात अनेकदा असतो. आज आम्ही या संदर्भात तुमची संदिग्धता दूर करणार आहोत. ही बातमी वाचून तुम्हाला कळेल की लहान मुलांना झोपवणं कसं योग्य आहे.


'सायकॉलॉजी टुडे' या अमेरिकन मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी पालकांच्या बेडवर झोपू नये. अन्यथा, त्यांच्या शरीराचा योग्य विकास होत नाही आणि ते पालकांच्या अधीन राहतात.



संशोधनात असे म्हटलं आहे की, मुलाच्या जन्मानंतर आईने बाळाला 1 वर्षांपर्यंत तिच्या बेडवर झोपवलं पाहिजे. यानंतर, मुलांना आपल्याच रुममध्ये एक लहान बेडवर झोपपावं. जेव्हा मुले 5 वर्षांची होतात तेव्हा त्यांना वेगळ्या खोलीत झोपायला हवे. ही खोली तुमच्या जवळ असावी, जेणेकरून मुल रात्री घाबरू नये आणि शांतपणे झोपू शकेल.


डॉक्टर म्हणतात की, खरं तर लहान मुलांचा 70 टक्के विकास हा झोपेत असताना होतो. त्यामुळे मुलांना रात्री मोकळेपणाने झोपण्याची संधी द्या. जर ते वेगळ्या बेडवर किंवा खोलीत झोपले असतील तरच हे होऊ शकते.


मुलांच्या पाठीच्या कण्याच्या विकासासाठी, त्यांना बेडवर पसरून झोपणे आवश्यक आहे. जर ते त्यांच्या पालकांसोबत एकाच बेडवर झोपले, तर ते त्यांना हवे तसे बाजूला करू शकत नाहीत किंवा ते मोकळेपणाने झोपू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लहान मुलांना स्वतंत्रपणे झोपायला लावणे योग्य आहे.



वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतंत्रपणे झोपणे खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने त्यांना त्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेची जाणीव होते. यासोबतच त्यांना आपला बेड कसा स्वच्छ ठेवायचा हे देखील माहीत आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.