Parenting Tips : आजच्या या फास्ट जगात मुलं ही फास्ट असतात अशावेळेस मुलांचे योग्य वेळी संगोपन करणे गरजेचे आहे. मुलांचे संगोपन करताना काही नियमांची आखणी करणे तितकंच महत्त्वाचे आहे. हल्लीच्या मुलांमध्ये वाढता उद्धटपणा पाहून शिस्त लावायची गरज आहे असं अनेकदा सांगितले जाते. (Parenting Tips Do you want your children to be successful Then follow these tips nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिस्त म्हणजे मारणे किंवा घाबरवणे नाही. पालकांनी कोणत्या गोष्टी मुलांसमोर बोलताना टाळल्या पाहिजेत अशी शिस्त पालकांमध्ये ही असणे खूप महत्त्वाचे आहे. तर आज आपण सदगुरुने सांगितलेल्या पॅरेटिंग टिप्सविषयी जाणून घेणार आहोत या टिप्समुळे तुमच्या मुलांचे भविष्य उज्जवल होईल...


1. घरातील वातावरण प्रेमळ असणे खूप महत्त्वाचे आहे. तणावपूर्ण वातावरण मुलांच्या संगोपणासाठी योग्य नाही. 


2. मुलगा असो वा मुलगी, त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की त्याने नेहमी आनंदी राहावे. प्रत्येक वयात वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. मित्रमंडळीसोबत आयुष्याचा आस्वाद घ्यावा. 


आणखी वाचा - Hina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा


3. प्रत्येक पालकाने काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे मुल १८ वर्षांचे होईपर्यंत घरातील वातावरण परिपूर्ण असावे.


4. भीती, चिंता, राग, निराशा अशाप्रकारे मुलांसमोर व्यक्त होताना अधिक काळजी घ्या. अन्यथा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.


5. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील याची काळजी घ्या. 


6. तुम्ही त्यांचे खरे मित्र व्हा. तुम्हाला त्यांच्यासोबत मैत्री करता आली पाहिजे.


7. तुम्ही मूलांच्या मनात सुपरस्टार व्हा.


8. तुम्ही मुलांना निसर्गाजवळ घेऊन जा. मुलांनी निसर्गात जास्त वेळ घालवला तर ते वाईट सवयींपासूनही दूर राहतील.


आणखी वाचा - Tejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न?


तुम्हाला जर  तुमच्यापेक्षा चांगली पिढी घडवायची आहे तर तुम्हाला पालक म्हणून ही जवाबदारी घ्यावी लागेल. मुलांचे आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर मुलांचा सर्वांगीण विकासही होईल.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)