मुंबई : डेल्टा व्हेरिएंटच्या वाढ होत असताना लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय. याचदरम्यान लसींच्या कमतरतेला समोरं जावं लागतंय. लसीची अनुपलब्धता अजूनही कायम आहे. लोकं पूर्वीपेक्षा अधिक सावध झाले आहेत. परंतु ज्यांनी अद्याप कोविडची लस घेतली नाही त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, ज्या पालकांनी लस घेतली नाही त्यांनी त्यांच्या मुलांसोबत नेहमीपेक्षा अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण त्यांना संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो.


कोविड 19 प्रौढ आणि लहान मुलांना सारख्याच प्रमाणा प्रभावित करतो


कोविड -19च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, प्रौढ आणि मुलं दोघंही प्रभावित झाले. प्रौढांमध्ये गंभीर संसर्गाची प्रकरणं जास्त असताना त्याचा मुलांवरही वाईट परिणाम होताना दिसला. लहान मुलं आणि प्रौढ यांच्यात सौम्य ते मध्यम संक्रमणापर्यंत विविध लक्षणं पहायला मिळाली. ताप, खोकला, चव कमी होणे ही मुलं आणि प्रौढांमध्ये कोविडची सामान्य लक्षणं होती.


लसीच्या अभावामुळे मुलांमध्ये संवेदनशीलता वाढते


भारतात, 18 वर्षांखालील मुलांनासाठी लसीकरण सुरु झालेलं नाही. मुलांसाठी लस नसल्याने मुलांमध्ये व्हायरस आणि गंभीर संसर्गाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत, डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांनंतर, पालक पूर्वीपेक्षा मुलांबद्दल अधिक चिंतित झाले आहेत.


लहान मुलांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणं


प्रौढांच्या तुलनेत मुले सौम्य लक्षणं दिसून येतात. ताप, सर्दी, थकवा, घसा खवखवणं आणि खोकला अशी लक्षणं सौम्य संसर्ग असलेल्या मुलांमध्ये सामान्य आहेत.


पालकांनी कोरोनाची लस घेणं किती गरजेचं


जर तुम्ही पालक असाल तर तुम्ही मास्क घालण, सोशल डिस्टंसिंग आणि प्रवास मर्यादित करणं यासारख्या सर्व खबरदारी घेण्याव्यतिरिक्त लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजं. सध्याची परिस्थिती पाहता, COVIDची लस हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवू शकता.