मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहात? तर अशी वाढवा रोग प्रतिकारशक्ती
मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी हजारो नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होतात. मेरेथॉनमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता धावल्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
मुंबईच्या मॅरेथॉन जवळ आली असून त्यामध्ये तुम्ही सहभागी होण्यास इच्छुक आहात? जर तुमची इच्छा असेल तर त्यापूर्वी रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची हे जाणून हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी हजारो नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होतात. मेरेथॉनमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता धावल्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
बरेच लोक त्यांच्या फिटनेस पातळीची चाचणी घेण्यासाठी देखील मेरेथॉनमध्ये सहभागी होतात. तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकही या शर्यतीत उत्साहाने सहभागी होतात. मात्र तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याविषयी मुंबईतील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. छाया वाजा यांनी खास टिप्स दिल्यात.
रोगप्रतिकारशक्ती वाढविणे का गरजेचं?
धावण्यामध्ये प्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ती आपल्या शरीराचे इन्फेक्शनपासून संरक्षण करतं. आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे धावपटू आजारांना बळी पडतात. तीव्र शारीरिक हालचाली शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे.
या उपायांचं पालन करा
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार घेणं गरजेचे आहे. भरपूर फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा, कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधित असते जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात.
पोषणाव्यतिरिक्त तणाव पातळीचे व्यवस्थापन करणे देखील आवश्यक आहे. उच्च ताणतणावामुळे शरीराची संक्रमणांशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणून मेडिटेशन, योगसाधना किंवा छंद जोपासून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.
एक मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली राखण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. रात्री 7-8 तासांची झोपेचे घ्या ट जेणेकरून तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती तसेच धावण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि लवचिकता मिळेल.
ध्यानधारणा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि नियमित शारीरिक हालचाली यासारख्या सरावांमध्ये गुंतल्याने तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते, एकूणच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीराचे कार्य सुरळीत राखण्यास मदत होते.