मुंबई : भारतात सापडलेला कोरोना नवा डेल्टा प्लस हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरतोय. कोरोनाचा हा प्राणघातक डेल्टा प्रकार आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये पसरला असल्याची नोंद करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अधनोम यांनी आतापर्यंतचा हा सर्वात संसर्गजन्य प्रकार असल्याचं सांगितलं आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकंचत झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले, "डेल्टा हा एक अधिक संक्रामक वेरिएंट आहे. हा सुमारे 85 देशांमध्ये पसरला आहे. एवढंच नाही तर हा वेरिएंट लस घेतलेल्या लोकांमध्येही वेगाने संक्रमित होताना दिसतोय." डब्ल्यूएचओने इशारा दिलाय की, जेव्हा आपण सार्वजनिक आरोग्य आणि सोशल डिस्टंसिंगच्या गोष्टी तितक्या गंभीरतेने घेत नाही तेव्हा जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणं झपाट्याने वाढू लागतात.


दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड टेक्निकल प्रमुख डॉ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "डेल्टा हा कोरोनाचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे आणि अल्फा वेरिएंटपेक्षाही हा संसर्गजन्य आहे. हा वेरिएंटही युरोपसह जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरला होता. डेल्टा प्रकार यापेक्षा अधिक संसर्गजन्य असून त्याची प्रकरणं जगभरात झपाट्याने समोर येत आहेत.


डेल्टा वेरिएंटची लक्षणं


  • ऐकण्याची क्षमता कमी होणं

  • पोट बिघडणं

  • रक्ताच्या गुठळ्या

  • गँग्रीन


इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या प्राथमिक आकडेवारीवरून असं दिसून येतं की, कोरोनाच्या या स्ट्रेनमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त आहे. डेल्टा स्ट्रेन B.1.617.2 म्हणून देखील ओळखला जातो. इतर वेरिएंट्सच्या तुलनेत डेल्टाचा प्रसार अधिक वेगवान आहे. त्याचप्रमाणे की लसीकरण झालेल्या लोकांसाठीही कोरोनाचा हा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे.


भारत सरकारच्या पॅनेलने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या दुसर्‍या प्राणघातक लाटेमागे डेल्टा वेरिएंट जबाबदार आहे. यूकेमध्ये सापडलेल्या अल्फाच्या स्ट्रेनपेक्षा हे 50 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.