`या` लोकांसाठी नुकसानकारक ठरेल फणस!
फणसात व्हिटॉमिन्स, अॅँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
मुंबई : फणसात व्हिटॉमिन्स, अॅँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे फणस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही लोकांसाठी त्याचे सेवन नुकसानकारक ठरते. पाहुया फणस खाणे कोणासाठी त्रासदायक ठरते...
फायबर्सयुक्त फणस पोट साफ करण्यास फायदेशीर ठरतात. पण ज्यांना पचनासंबंधित काही त्रास असल्यास फणसाचे सेवन करणे टाळावे. कारण फणसाच्या सेवनाने पचनावर विपरित परिणाम होतो.
# प्रेग्नेंसीच्या काळात महिलांनी फणस खाणे टाळावे. त्यामुळे गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर स्तनपान करताना फणस खाणे टाळावे.
# कोणतेही ऑपरेशन किंवा सर्जरी झाल्यानंतर फणसाचे सेवन करु नये.
# जेवल्यानंतर पान खाण्याची सवय आहे का? मग ज्या दिवशी पान खाल त्यादिवशी फणस खावू नका आणि फणस खाल्यास त्यावर पानाचा आस्वाद घेऊ नका.
# पित्ताचा त्रास असलेल्यांनीही फणस खाणे टाळावे.
# फणस खाल्यानंतर दूध पिऊ नका. कारण दूधाची आणि फणसाची प्रक्रिया होऊन दाद, खाज, खुजली आणि सोरायसिय सारखे आजार होण्याचा धोका असतो.