मुंबई : कोरोनावर लस आली मात्र गोळी कधी येणार असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. यातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात अमेरिकेच्या आरोग्य नियामकांनी बुधवारी एका औषधाला मान्यता दिली आहे. 'फायझर'ची ही गोळी असून संसर्गाचे धोकादायक परिणाम टाळण्यासाठी घरच्या घरी याचा वापर केला जाऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक साथीचा सामना करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.


अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, प्रशासन औषधांचं वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी पावलं उचलतील. हे 'पॅक्सलोव्हिड' औषध संसर्ग झालेल्या व्यक्तींना त्याचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सुरुवातीच्या काळात याचा पुरवठा खूपच मर्यादित असेल. 


कोरोनाच्या लढाईत ऐतिहासिक पाऊल


दुसरीकडे 'मर्क' फार्मास्युटिकल कंपनीची अँटी इन्फेक्शन गोळीही लवकरच अधिकृत होण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेने पॅक्सलोविड गोली बनवून कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका कमी करण्याचा दावा केला आहे.


अमेरिकेतील शास्त्रज्ञ पॅट्रिझिया कॅवाझोनी यांनी सांगितलं की, कोरोनाच्या उपचारासाठी ही गोळी यशस्वीपणे तयार करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या जागतिक लढाईतील हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.


फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अल्बर्ट बोरुला यांनी सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या 2,200 लोकांवर या गोळीची चाचणी केल्याने अनपेक्षित परिणाम मिळाले. या टॅब्लेटमुळे मृत्यूचा धोका 88 टक्क्यांनी कमी होऊ शकतो


तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, गोळीची काम करण्याची पद्धत अँटीबॉडीज किंवा लसींपेक्षा थोडी वेगळी असल्याने, ही गोळी केवळ ओमायक्रॉनच नाही तर कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटवर प्रभावी ठरू शकते.