मुंबई : वेगवेगळ्या अभ्यासानुसार संगीताचं सामर्थ्य समोर आले आहे. ताणतणाव कमी करण्यात संगीताची मोठी मदत होते. एका रिसर्चनुसार म्युझिक आपलं आरोग्य ठणठणीत राखण्यास काम करतं. म्युझिक आणि भावना यात एक वेगळंच आपुलकीचं नातं आहे. साइंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर हायपरटेन्शनच्या औषधाची मात्र व्यवस्थित लागू पडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीत ऐकल्याने उच्च रक्तदाब व्यवस्थित होण्यास मदत होते. जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. 


या निमित्ताने तुम्ही संगीत या विषयाचे फायदे जाणून घ्या.


संगीत एक अशी गोष्ट आहे जी भाषा, संस्कृती आणि धर्माच्या पलीकडे आहे आणि सर्व ठिकाणी आहे. संगीत एक वेगळाचा जादू आहे.


ताणतणाव - जेव्हा तुमचा मूड चांगला नसतोय, तेव्हा शांत म्युझिक ऐकावेसे वाटते. परंतू अशा वेळेस फास्ट बीट्स ऐकल्याने तुमचा मूड चांगला होऊ शकतो.


अस्वस्थता - तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर विचार करत असाल, तर म्युझिक तुम्हाला मदत करेल, आणि तुमचे मन शांत करेल. 


मेमरी - म्युझिकमुळे तुमची स्मरण शक्ती ही वाढते.


गर्भधारणा - गर्भवती असताना तिसऱ्या महिन्यापासून बाळ बाहेरील आवाज ऐकू शकतो. त्यामुळे आईला सांगितले जाते की तुम्हाला आवडेल ते संगीत ऐका म्हणजे बाळाच्या विकासात मदत होईल.