Piles Cure: मुळव्याधचा त्रास आहे तर या 4 गोष्टी लगेच सोडा
मूळव्याध असेल तर आहात देखील बदल करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला यापासून आराम मिळू शकतो.
मुंबई : मुळव्याध ही अशी समस्या आहे ज्यामुळे आज लाखो लोकं त्रस्त आहेत. हा आजार बद्धकोष्ठता, लठ्ठपणा आणि तासनतास बसणे किंवा उभे राहणे यामुळे होतो. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला होतो. बद्धकोष्ठता या आजारामुळे शरीरातील अशुद्धता वाढते, त्यामुळे पचनक्रिया बिघडू लागते. हा आजार गर्भधारणेदरम्यान महिलांना त्रास देतो. मूळव्याध म्हणजे मुख्यतः रक्तवाहिन्या सुजलेल्या असतात.
या आजारात गुदद्वाराभोवती कडकपणा जाणवतो. या आजाराच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर, गुदद्वाराभोवती खाज सुटणे, गुदद्वाराभोवती चिकटपणा जाणवणे. वेदना, अस्वस्थता, रक्तस्त्राव आणि गुदद्वाराजवळ सूज येणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुळव्याध या आजारात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.
जर तुम्हालाही मूळव्याधच्या लक्षणांनी त्रास होत असेल तर आहारात काही बदल करा. मूळव्याधची लक्षणे दूर करण्यासाठी काही पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. मूळव्याधची लक्षणे कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळणे आवश्यक आहे.
फास्ट फूड टाळा: जर तुम्हाला मूळव्याधची लक्षणे नियंत्रित करायची असतील तर फास्ट फूड टाळा. फ्रेंच फ्राईज, तळलेले मोमोज, समोसे, कचोरी आणि फास्ट फूड, तेल आणि मसाल्यांनी भरपूर पदार्थ यामुळे पचनक्रिया कमजोर होते. या पदार्थांमुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. बद्धकोष्ठता असल्यास मूळव्याधची लक्षणे वाढतात.
व्हाईट ब्रेड: पांढऱ्या ब्रेडच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. पांढरा ब्रेड पचनक्रिया बिघडवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढवते.
चहा आणि कॉफी : जर तुम्हाला मूळव्याधच्या लक्षणांमुळे त्रास होत असेल तर आहारात चहा आणि कॉफीचे सेवन अजिबात करू नका. चहा आणि कॉफीच्या सेवनाने मूळव्याधची लक्षणे वाढू शकतात. चहा प्यायचा असेल तर हर्बल चहा घ्या. हर्बल चहाचे सेवन केल्याने आतड्याच्या हालचाली दरम्यान सूज कमी होते.
सिगारेट ताबडतोब सोडा: मूळव्याध असलेल्या रुग्णांनी मादक पदार्थांचे सेवन बंद करावे. सिगारेट आणि गुटखा यामुळे हा त्रास वाढू शकतो.