मुंबई : ड्रायफ्रूट्स आपण शरीरसाठी हेल्दी म्हणून खातो. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईट असतो. अगदी तसंच ड्रायफ्रूट्सचं अति सेवन शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला पिस्ता आवडतो म्हणून तुम्ही तो रोज अति खाता का? जर तुम्हाला तशी सवय असेल तर ते घातक ठरू शकतं. त्यामुळे आजच ही सवय बदला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिस्त्याचा वापर खीर, मिठाई आणि इतर अनेक गोष्टींमध्ये केला जातो. तुम्हाला याच्या फायद्यांबद्दल खूप माहिती असेल पण त्याच्या अति सेवनामुळे होणारे तोटे किंवा नुकसान माहिती आहे का? पिस्त्याचं अति सेवन हानीकारक कसं ठरू शकतं हे आज जाणून घेऊया. 


पिस्ते खाल्ल्याने वजन वाढतं, अशा परिस्थितीत जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी यापासून दोन हात लांबच राहाणं बरं. जर तुम्हाला पिस्ता खायचाच असेल तर फक्त 1-2 पिस्ते खा ज्यामुळे तुमच्या वजनावर इतका परिणाम होणार नाही.


ब्लड प्रेशरची समस्या आजकाल अनेकांमध्ये दिसत आहे. बीपी असलेल्यांनी पिस्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असतं. जे हृदयासाठी जास्त त्रासदायक होऊ शकतं.


कोणत्याही गोष्टीबाबत अति करणं केव्हाही वाईटच असतं. पिस्ते जास्त खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामध्ये प्रथिने आढळतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील प्रोटीनचे प्रमाण वाढते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय, अॅलर्जीची समस्या देखील होऊ शकतात. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी एलर्जी येऊ शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)