मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. पण या विषाणूवर अद्याप कोणत्याही प्रकारची लस विकसीत झालेली नाही. सर्वच देश या धोकादायक व्हायरसवर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. लस नसल्यामुळे डॉक्टर विविध प्रकाचे औषधांचा वापर करून रुग्णांना बरं करत आहेत पण सध्याची परिस्थिती पाहता प्लाझ्मा थेरपी कोरोना व्हायरसवर अत्यंत उपायकारक आहे असं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने (आयसीएमआर)  अनेक राज्यांनी प्लाझ्मा थेरपीवर वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. केरळ, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपी करण्यास सुरूवात केली आहे. इतर १०० संस्थांनी या अभ्यासामध्ये रस दर्शविला आहे, की या प्राणघातक विषाणूवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी किती सुरक्षित आणि कार्यक्षम आहे. 


काय आहे प्लाझ्मा थेरपी
कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचार पद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेण्याऱ्या  रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो.


कसे करते काम
प्लाझ्मा थेरपीमध्ये  एका निरोगी व्यक्तीकडून आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती स्थालांतरीत करून रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते. या थेरपीमध्ये कोरोना व्हायसरवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी अ‍ॅंटीबॉडीज तत्वाचा वापर केला जातो. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या इम्युन सिस्टिमला बळ देतात.