मुंबई : महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लॅस्टिकच्या वापर करणार्‍यांवर 5000 ते 25,000 रूपये आणि तुरूंगवासाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जीवनात अगदी लहान सहान गोष्टींमध्येही प्लॅस्टिकचा होत असे. मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे आता त्याला वेगवेगळ्या स्तरावर काय पर्याय असू शकतो ? हे नक्की जाणून घ्या. 


सेल्फ कमोस्टेपल प्लॅस्टिक - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रामुख्याने ओल्या वस्तूंचा, कचर्‍याचा साठा करण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणं आवश्यक आहे.अशावेळेस पर्यावरणपुरक प्लॅस्टिकचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. सहज विघटन होईल अशा पर्यावरणपुरक प्लॅस्टिक बॅग्स, गारबेज बॅग्सचा वापर करा. 


खाऊ शकाल असे चमचे - 


हॉटेलमध्ये किंवा पिकनिकला फिरायला जाताना प्लेट्स, चमचे, ग्लास घेऊन जाणं आवश्यक आहे. अशावेळेस आता इटेबल चमचे म्हणजेच पदार्थ खाण्यास फायदेशीर आणि पदार्थ खाल्ल्यानंतर वापरण्यात आलेले चमचेदेखील खाऊ शकाल असे चमचे उपलब्ध आहेत. 


पत्रावळ्या - 


आजपर्यंत प्रवासात फिरताना थर्माकोलच्या हलक्या प्लेट्स घेऊन जाण्याकडे अनेकांचा कल होता. मात्र थर्माकोल पर्यवरणपूरक नसल्याने त्यावर बंदी आली आहे. प्रवासात किंवा घरागुती पार्ट्यांमध्ये पाण्याचा अपव्यया टाळण्यासाठी पत्रावळ्यांचा वापर करणं आरोग्याला फायदेशीर आहे. 


वॅक्स पेपर - 


सॅन्डव्हिच, वडापाव, समोसे असे खाद्यपदार्थ अनेकजण प्लॅस्टिकबंदीनंतर वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून आणतात. मात्र तळकट पदार्थ पेपरमध्ये गुंडाळल्याने त्यामधील इंक पोटात गेल्यास आरोग्याला नुकसानकारक ठरते. त्याऐवजी असे खाद्यपदार्थ वॅक्स पेपरमध्ये गुंडाळा. वॅक्स पेपर रिसायकलेबल नसले तरीही ते बायोडिग्रेडेबल आहे. 


पर्यावरणपुरक बॅग्स 


फळ, भाज्या किंवा किराणामालाच्या वस्तूंसाठी तुम्हांला प्लॅस्टिक बॅगची सवय असल्यास त्याऐवजी आता ज्यूट बॅग, कापडी पिशव्या, डेनिम बॅग्स किंवा सिंथेटीस फायबर्सच्या बॅग वापरणं फायदेशीर आहे. विघटन होणारं प्लास्टिक बाजारात, जाणून घ्या वैशिष्ट्ये


कंटेनर्स - 


फ्रीजमध्ये निवडलेल्या भाज्या साठवण्यासाठी अनेकांना प्लॅस्टिक बॅग वापरण्याची सवय असेल मात्र त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपुरक प्लॅस्टिक कंटेनर्स बाजारात उपलब्ध आहेत. 


स्टीलचे डब्बे -


शक्य असल्यास बाजारातून मांसाहार आणताना प्लॅस्टिकऐवजी स्टीलचे डब्बे किंंवा कंटेनर वापरा.