Post Pregnancy Tips : गरोदरपणाचा काळ कोणत्याही महिलेसाठी फार आव्हानात्मक असतो. गर्भ धारण केल्यापासून ते अगदी प्रसूतीपर्यंत पावलोपावली महिलांची परीक्षाच पाहिली जाते असं म्हणायला हरकत नाही. मानसिक आणि शारीरिक बदल आणि त्यामुळे उदभवणारी परिस्थिती बऱ्याचदा आटोक्याबाहेर जाते. अशा वेळी काही गोष्टींबाबत सतर्क असणं केव्हाही फायद्याचं ठरतं. (Post Pregnancy Tips Important news about womens health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणा आणि प्रसूतीनंतर महिलांच्या शरीराची कसोटी असते. वाढलेलं वजन आणि त्यानंतर पुन्हा खाली आलेला वजनाचा आकडा या साऱ्यामधील संतुलन बिघडल्यामुळे शरीरालाही यातून पुढे जाण्यासाठी वेळ जातो. यावर उपाय म्हणून औषधं त्यांचं काम करतच असतं. पण, आहाराच्या सुयोग्य सवयीसुद्धा इथं महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रसूतीनंतरच्या काळात महिलांनी काही घरगुती काही उपचार केले कर, त्याचाही मोठा फायदा होतो. 



बाळाच्या जन्मानंतर आईच्या आहारात पोषक तत्त्वांची पूर्तता करणं अतीव महत्त्वाचं. यासाठीच नव्या मातांना बदाम, खारिक खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा बदामचा शिरा खाण्याचेही सुचवले जाते. बदामच्या शिऱ्यात कार्बोहाइड्रेट, विटामिन बी12, ई, मिनरल्‍स, मॅग्‍नेशियम, कॉपर, मँगनीज आणि फॉस्‍फरस हे घटक असतात. त्यामुळं तुमच्याही घरात कोणी प्रसूत महिला असेल तर त्यांना बदामाचा शिरा नक्की द्या.  


आणखी वाचा... Self Dating: कायम सुखी राहण्याचा सर्वात सोपा पण तेवढाच सिक्रेट फंडा


बदामचा शिरा बनवण्यासाठी लागणारी सामग्री


ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला 1½ कप बदाम, 3 कप डबल टोन्ड किंवा स्किम्ड दूध, ¼  कप तूप, ½ कप साखर, 1 टीस्पून पातळ केशर पेस्ट, 1 टीस्पून चिरलेला पिस्ता लागेल.


बदाम शिरा कसा बनवायचा
1. बदाम रात्रभर भिजत ठेवा. भिजवलेले बदाम खाणे चांगले. सकाळी त्याची साल काढून बारीक वाटून घ्या.
2. एका जड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करा. बदामाची पेस्ट मंद आचेवर हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
3. मिश्रणात हळूहळू दूध घाला आणि सतत ढवळत राहा. 
4. आता एक उकळी येऊ द्या आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
5. साखर घाला आणि पुडिंगसारखे घट्ट होईपर्यंत आणखी काही मिनिटे शिजवा. गरमागरम केशर पेस्ट आणि चिरलेला पिस्ता घालून सर्व्ह करा.
 
बदामच्या शिऱ्यात साखर आणि दुधाचे प्रमाण असल्यामुळे तुम्ही हा शिरा सकाळच्या नाशत्यात सुद्धा खाऊ शकता किंवा एक कप गरम दुधात 2 चमचे शिऱ्याचे घालुन तुम्ही ते पिऊ शकता.


आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स


बदामच्या शिऱ्याचे फायदे
बदामामध्ये भरपूर फॅट, प्रथिने आणि फायबर असतात जे प्रसूतीनंतर वजन कमी करण्यास मदत करतात. बदामामध्ये फायबर देखील भरपूर असतं, ज्यामुळं अपचन टाळण्यास मदत होते. त्याचबरोबर तुपामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि गुळाची चवही वाढते.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)