Self Dating: कायम सुखी राहण्याचा सर्वात सोपा पण तेवढाच सिक्रेट फंडा

आम्ही तुम्हाला स्वत:सोबत डेट करण्याच्या 3 टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हला स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होईल...

Updated: Sep 26, 2022, 08:19 PM IST
Self Dating: कायम सुखी राहण्याचा सर्वात सोपा पण तेवढाच सिक्रेट फंडा  title=
you know what 3 ways to date yourself NZ

Self Dating: जग तुमच्यासोबत कसं वागते हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही स्वत:सोबत कसं वागता यावर सगळं अवलंबून आहे. तुमच्या आवडीनिवडी, भविष्यातील प्लान, किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार निवांत वेळेत झाला पाहिजे. त्यामुळे स्वत:सोबत वेळ घालवा, स्वत:ला समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला स्वत:सोबत डेट करण्याच्या 3 टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हला स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होईल... (you know what 3 ways to date yourself NZ)

1. स्वतःची कंपनी, बेस्ट कंपनी (do things alone)

एकेदिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पुर्ण दिवसाचं प्लॅनिंग करा. पण त्यादिवशी स्वत:सोबत एक निश्चय करा, तो दिवस फक्त स्वत:सोबत घालवाल. छान तयार व्हा. उदाहरणार्थ एखादा छान चित्रपट पाहायला जा, दुपारचे जेवण तुमच्या आवडीप्रमाणे बाहेर करा. संध्याकाळी एखाद्या कॅफेत जाऊन कॉफी घ्या. स्टॅडप कॉमेडी किंवा स्टोरीटेलिंग सारखे लाईव्ह शो पाहा. उरलेली संध्याकाळ समुद्र किनारी बसून सूर्यास्त पाहा. हे सगळं करताना तुम्ही एकटे असाल याची काळजी घ्या. कारण आपण नेहमीच प्रत्येकासोबत वेळ घालवत असतो. पण स्वत:सोबत क्वचित वेळ घालवतो. अशा पद्धतीने जर स्वत:सोबत तुम्ही वेळ घालवला तर तो क्षण अविस्मरणीय असेल असा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल.

आणखी वाचा...  Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स

2. स्वतःला ओळखा  (get to you know)

संध्याकाळचा कॉफी किंवा चहा घेत स्वत:सोबत वेळ घालवा. अशावेळेस असे काही प्रश्न विचारा ज्यातून जाताना तुम्हाला त्रास जाणवत आहे. स्वत:शी बोला, जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत स्वत:ला प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना स्वत:ला त्रास करुन घेऊ नका. पण प्रश्न विचारा. आतापर्यंत तुम्ही कुठे चुकत होता, चुकत आहात, याचा विचार करा. नवीन काय शिकण्याची गरज आहे. कोणत्या गोष्टीत जास्त वेळ घालवला पाहिजे, कुठे वेळ घालवला नाही पाहिजे याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. अशावेळेस तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्हाला काय आवडते काय नाही आवडत याचा विचार करा. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचा विसर पडला पाहिजे हे देखील त्यात आले पाहिजे. एखाद्या वहीत तुम्हाला सापडलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवा. जेव्हा  ही चुकल्यासारखे वाटेल तेव्हा ती वही उघडुन कुठे चुकत आहात याचा शोध घ्या.

आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स

3. स्वतःच्या पाठीवर शाबासकी द्या - (cheer for youself)

आपल्यं आयुष्य हे क्रिकेट मॅच नाही आहे. आपल्या आयुष्यातला हिरो आणि प्रेक्षक आपणच असतो. त्यामुळे आपल्यासाठी कोणी टाळ्या वाजवतील याची अपेक्षा करु नका. स्वत:ला मोटीवेट करण्यासाठी टाळ्या वाजवा आणि जर कुठे चुकत असाल तर जाब ही विचारा. आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीसाठी स्वत:ची पाठ थोपटा. शक्य असल्यास स्वत:चे दररोज कौतूक करा अशाने तुम्ही प्रेरित व्हाल.