मुंबई : नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. 
 
- बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. 


- इतकेच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदयरोग दूर ठेवण्यासाठी मदत करतात.


- बटाट्यांमध्ये 'व्हि़टॅमिन सी' , 'व्हिटॅमिन बी६' , 'पोटॅशिअम' , 'मॅग्नेशिअम' , 'झिंक आणि फॉस्फरस'ही आढळते. तुमची त्वचा तजेदार राहण्यासाठी हे घटक महत्वाचे ठरतात. 


- तसेच बटाट्यांमधील 'व्हिटॅमिन सी' रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. 


- बटाट्यांमध्ये असलेलं फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं तुम्हाला कॅन्सरपासून दूर ठेवते...