मुंबई : देशातील वाढत्या कोरोनाच्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे. दरम्यान देशात ओमायक्रॉनचा धोका पाहता पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली की, देशातील 15 ते 18 वर्षांच्या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल आणि आघाडीचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिला जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आता या बूस्टर डोससंदर्भात नवीन अपडेट आहे. यामध्ये ज्या लोकांना कोरोना लसीचे 2 डोस मिळाले आहेत ते कोणत्याही नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रात भेट घेऊ शकतात किंवा वॉक-इन करू शकतात.


नोंदणी आवश्यक नाही


याचं वेळापत्रक शनिवारी म्हणजेच ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधाही शनिवारी संध्याकाळपासून सुरू होणार आहे. पात्र व्यक्तींना बूस्टर डोसचं लसीकरण १० जानेवारीपासून सुरू होणार आहे.


आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांच्या अधिक वयाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. कोविड-१९ लसीचा बूस्टर डोस पहिल्या दोन डोस सारखाच असेल. 


NITI आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, ज्या व्यक्तींनी कोविशील्ड लसीचे पहिले दोन डोस घेतले आहेत त्यांना कोविशील्ड लसच दिली जाईल. तर ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतलीये त्यांनी कोवॅक्सिन लस देण्यात येईल.