मुंबई : आई होणं हे प्रत्येक महिलेसाठी एक खास अनुभव असतो. दरम्यान मासिक पाळी चुकणं हे गरोदर असल्याचं पहिलं लक्षण मानलं जातं. या लक्षणानंतर प्रेग्नेंसी टेस्ट आणि इतर गोष्टींना सुरुवात होते. मात्र महिलांना माहित आहे का, गर्भावस्थेच्या सुरुवातीला पिरीयड्स मिस होण्यापूर्वी देखील काही लक्षणं दिसून येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भावस्थेच्या सुरुवातील दिसणारी कताही लक्षणं ही त्यांच्या शरीरात होणारे बदलाव आहेत. ही लक्षणं पीएमएस म्हणजेच प्रिमेस्ट्रुअल सिंड्रोमसारखी आहेत. जाणून घेऊया या लक्षांच्या बाबतीत.


स्तनांना सूज येणं


प्रेग्नेंसीच्या सुरुवातीला महिलांच्या स्तनांना सूज येऊ शकते. त्याचप्रमाणे अनेक स्तन संवेदनशील देखील होण्याची शक्यता असते. यामध्ये स्तनांना स्पर्श केल्यास दुख जाणवते. शरीरात प्रोजेस्ट्रोन हार्मोनची मात्रा वाढल्यामुळे हा बदल होतो.


एरिओलाचा रंग गडद होणं


महिलांच्या स्तनांवर एरिओला भाग असतो. या भागाचा रंग गडद होतो. हा बदलाव महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा बदल जाणवू शकतो.


सतत लघवी होणं


गर्भावस्थेत महिलांचं शरीर पहिल्यापेक्षा जास्त ब्लड पंपिंग करतं. ज्यामुळे महिलांना सतत लघवीला जावं लागण्याची शक्यता आहे. गर्भावस्थेच्या पहिल्या काही आठवड्यांध्ये हा बदल दिसून येऊ शकतो.


ब्लीडिंग


गर्भधारणेच्या 10 ते 14 दिवसांनंतर महिलांना इंप्लांटेशन ब्लीडिंग होऊ शकतं. यामध्ये हल्का रक्तस्राव होऊ शकतो. हे ब्लीडिंग संभाव्या मासिक पाळीच्या एक आठवडा अगोदर होऊ शकतं. 


अन्य लक्षणं


1. पोट फुगणं


2. वजायनल डिस्चार्ज


3. थकवा जाणवणं