मुंबई : प्रेग्नेंसी एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये महिलेला अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. गर्भधारणेदरम्यान बाळाचं आरोग्य आणि जीवन हे आईच्या हातात असतं. यावेळी आईच्या खाण्यापिण्याचा परिणाम हा बाळावरही होतो. त्यामुळे या काळात महिलांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. अशी काम आहेत जी महिलांनी गर्भधारणा झाली असताना करू नयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भधारणेदरम्यान महिलांनी कोणतंही मोठं तसंच वजन उचलण्याचं काम करू नये. अनेकदा महिला फर्निचर हलवण्यातं काम सामान्य आहे म्हणून करतात. मात्र असं करू नये. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. यामुळे जॉईंट्सचे टिश्यू लूज पडतात. यामुळे अनेक धोके उद्भवू शकतात.


गर्भधारणेदरम्यान जास्त काळ उभं राहू नये. दरम्यान या वेळेस पोटामध्ये बाळाच्या वजनाने ताण येतो आणि पायांना सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशामध्ये दीर्घकाळ उभं राहिल्याने पायांमध्ये वेदना जाणवते शिवाय कमरेतही वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान दीर्घकाळ उभं राहू नये.


गर्भधारणेदरम्यान खाली वाकणं ही धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे घरातील कामं जसं की. झाडू मारणं, कपडे धुणं ही कामं शक्यतो टाळावीत. जर तुम्हाला कधीही काम करताना त्रास जाणवला तर ते काम करणं तातडीने बंद करावं.


गरोदर असताना टेबल किंवा शिडीवर चढून काम करणं धोकादायक ठरू शकतं. महिलेच्या पोटात एक जीव असल्याने वजन वाढलेलं असतं. अशा काळात शरीराचं संतुलन बिघडलं तर ते आई आणि बाळाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं.