White Hair Problem:कमी वयात केस पांढरे? गुळासोबत खा फक्त `हा` पदार्थ
पांढरे झाल्यामुळे लाजिरवाणे आणि आत्मविश्वास कमी होतो.त्यामुळे केस कलर करण्याऐवजी करा हे घरगुती उपाय.
मुंबईः पांढरे केस हे म्हातारपणाचं लक्षण मानलं जातं, त्यामुळे कमी वयातच केस पिकण्याची तुम्हाला चिंता वाटत असेल, तर तुम्ही खास घरगुती उपाय करू शकता.
डोक्यावर पांढरे केस दिसणे म्हणजे म्हातारपण सुरू झाले असे समजायचे, परंतु सध्याच्या काळातील व्यस्त जीवनशैली आणि अनारोग्यकारक आहाराच्या सवयींमुळे आता तरुणांचे केस 25 वर्षांतच पिकण्यास सुरवात होते, मात्र काहीवेळा ही समस्या अनुवांशिक असू शकते. केस पांढरे झाल्यामुळे लाजिरवाणे आणि आत्मविश्वासाचा कमी होतो.
आता प्रश्न पडतो की अशा परिस्थितीत तरुणांनी काय करावे? केसांना कलर केल्यास केस कोरडे किंवा अनैसर्गिक दिसू लागतात. फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.
अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गूळ आणि मेथीचे दाणे नियमित सेवन केल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतात.
मेथी दाणे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, पण जर ते गुळासोबत खाल्ले तर त्याचा प्रभाव दुपटीने वाढतो. मेथीचे दाणे बारीक करून पावडर बनवा आणि रोज सकाळी उठून गुळासोबत सेवन करा.
हा उपाय काही दिवस केल्यास केस अकाली पांढरे होणे तर थांबेलच पण उरलेले पांढरे केसही पुन्हा काळे होतील.
मेथीदाणे आणि गूळ खाल्ल्याने केसगळतीपासून सुटका मिळते आणि केस पूर्वीपेक्षा मजबूत आणि चमकदार होतात.
मेथीचा प्रभाव उष्ण असल्याने अशा परिस्थितीत उन्हाळ्यात नुकसान टाळण्यासाठी मेथीचे पाणी प्यावे. मेथीचे पाणी तयार करण्यासाठी त्याचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उकळून प्या.
मेथीचे दाणे केसांना लावून धुतल्यास त्याचाही खूप फायदा होतो. मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा.