मुंबई : वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच कमी करणे कठीण आहे. अनेकदा लोक डाएट, व्यायाम आणि योगाच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. पण एक खास तंत्र आहे. त्यासाठी तुम्हाला अधिक काही करण्याची किंवा कोठे जाण्याची गरज नाही. अॅक्युप्रेशरचा वापर करुन शरीराच्या काही अवयवांवर खास प्रेशर द्या. हे अवयव दाबल्याने भूक नियंत्रित राहते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. अॅक्युप्रेशर एक्सपर्ट्सनुसार, फक्त अवयवांवर प्रेशर देण्याचे योग्य तंत्र अवगत असायला हवे. यासाठी एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार या पॉईंट्सवर प्रेशर द्या. जाणून घेऊया कोणते आहेत ते ५ अवयव...


हात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी हाताचे मेन पॉईंट्स दाबल्यास फायदा होईल. यासाठी हाताच्या अंगठ्याजवळील फुगीर भागावर २ मिनिटे बोटाने दाबा. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.


पाय


टाचेच्या मागे जिथे हाड संपते तिथे बोट आणि अंगठ्याच्या मदतीने मिनिटभर दाबून ठेवा. रोज असे केल्याने पचनतंत्र सुधारते आणि वजन नियंत्रित राहते.


कान


कानाच्या मांसल भागाला बोटाने ३ मिनिटे दाबा. असे नियमित केल्याने अधिक भूक लागत नाही. परिणामी त्यामुळे वजन वाढत नाही.


नाभी


नाभीच्या खालच्या बिंदूवर दोन हातांनी दोन्ही बोटांनी प्रेशर द्या. त्यानंतर पोटरीचे हाड बोटाने दाबा. नियमित असे केल्याने स्थुलता कमी होण्यास मदत होते.


कोपर


कोपराचे ज्वाईंट अंगठ्याने दाबल्याने फायदा होतो. रोज ५ मिनिटे असे केल्याने वजन वाढत नाही.