मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हारसमुळे अनेकांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांना पत्र लिहून मदत करण्याचं अश्वासन दिलंय. त्याचबरोबर यात ज्यांचे बळी गेले आहेत त्यांच्याबद्दल शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. तर चीनच्या हुबोई प्रांतातून भारतीय नागरिकांना परतन्यासाठी चीन सरकारनं ज्या सुविधा दिल्या त्याबद्दलही आभार व्यक्त केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगाने पसरणाऱ्या करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने चीन व इतर प्रभावित देशांना १० कोटी डॉलर इतकी मदत देऊ केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील खासगी क्षेत्रातील व्यक्तींनी मोठय़ा प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. अमेरिकी सरकारने ठेवलेल्या संकीर्ण निधीतून ही मदत दिली जाणार आहे.


त्याचप्रमाणे, चीनच्या कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थकारणावर देखील मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली असून त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम होताना दिसतोय. भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली  आहे. 


शिवाय, कोरोना व्हायरसमुळे तिथल्या बड्या कंपन्यांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनानं चायनाचं कंबरडं मोडलंय. चीनमध्ये अॅपल फोनची ४२ शो रुम्स बंद आहेत. तर स्टारबक्सचे चार हजारांच्या वर कॅफे बंद पडलेत. कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे.