मुंबई : लिव्हर म्हणजे यकृत आपल्या शरीरात प्रमुख अंगापैकी एक. लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून अन्न पचनासाठी मदत करते. लिव्हरचे कार्य बिघडणे आरोग्यासाठी घातक ठरते. एक खास ड्रिंक जे यकृतातील विषारीद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. पाहुया ते कसे तयार करायचे...


असे करा ड्रिंक तयार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे खास ड्रिंक बनवण्यासाठी २ कप पाणी उकळवा. पाणी उकळू लागल्यावर त्यात काही मनुके घाला. त्यानंतर ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यानंतर हे पाणी रात्रभर थंड होण्यसाठी ठेवा.


असे करा सेवन


हे ड्रिंक रोज प्या. पाण्यात मधेच येणारे मनुके फेकण्याची चूक करु नका. नाश्ताला देखील तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. हे ड्रिंक तीन दिवस नियमित घ्या. याच्या सेवनाने लिव्हर स्वच्छ होईल आणि पोटासंबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.


लिव्हर खराब होण्याची लक्षणे


  • डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे

  • तोंडातून दुर्गंधी येणे

  • पोटात सूज येणे

  • पचनतंत्र बिघडणे

  • त्वचेवर सफेद डाग

  • डोळे पिवळसर होणे.


लिव्हर खराब होण्याची कारणे


  • खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी

  • धुम्रपान

  • मद्यपान

  • कोलेस्ट्रॉलयुक्त आहाराचे सेवन