Raju shrivastav Death: जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा?
जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धोका कसा टाळावा. जाणून घ्या.
मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) यांचे आज दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) रुग्ण मध्ये निधन झाले. जिममध्ये व्यायाम (Gym workout) करताना त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack during workout) आला होता, तेव्हापासून त्यांचा मृत्यूशी झुंज सुरु होती. याआधीही काही चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचे वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना आहेत. अनेकांना लहान वयातच जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जिम करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिममध्ये वर्कआऊट (Workout) केल्याने हृदयाविकाराचा धोका का वाढत आहेत? कोणत्या चुकांमुळे असं होत आहे हे देखील जाणून घेण्याची गरज आहे. जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? जाणून घेऊया.
तुम्ही जिममध्ये व्यायाम करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी तज्ज्ञ सांगतात की, तुमचे वय ५० पेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही जिममध्ये जाण्यास सुरुवात करत असाल, तर आधी हृदयरोगतज्ज्ञांकडून स्वतःची तपासणी करून घेणे किंवा तणावाची चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा व्यायाम करताना हलकी डोकेदुखी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम सुरू करावा. कोणत्याही प्रकारचा व्यायाम जास्त करणे टाळले पाहिजे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मध्यम व्यायाम पुरेसा आहे. व्यायाम संतुलित पद्धतीने केला पाहिजे.
व्यायामादरम्यान स्वतःला योग्यरित्या हायड्रेटेड ठेवा आणि पूर्ण वेळ जिममध्ये जाणे टाळले पाहिजे.