जिम, डाएट नाही तर `या` डाएटच्या प्रकाराने 13 किलो वजन 21 दिवसांत केलं कमी, नक्की प्रकार काय?
Real Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले जातात. पण चक्क पाणी पिऊन वजन कमी कसं होतं? हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. Water Fasting कसं फॉलो कराल.
आदिर मिलर या तरुणाने 21 दिवसांत फक्त पाणी पिऊन 13 किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय वापरले जातात. पण चक्क पाणी पिऊन वजन कमी केलं आहे. मिलरने आपल्या Water Fasting चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये वजन कमी करण्याची ट्रिक सांगितली आहे.
डाएटसाठी फॉलो केली ही ट्रिक
वजन कमी करण्यासाठी त्यांनी अवलंबलेली पद्धत म्हणजे वॉटर फास्टिंग. वॉटर फास्टिंगमध्ये मिलरने 21 दिवस काहीही न खाता आणि फक्त पाणी न पिता काढले. वजन कमी करण्याचा वॉटर फास्टिंग योग्य मार्ग आहे का? हे आपण समजून घेऊया, हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी सध्या वॉटर फास्टिंगचा ट्रेंड आहे. या पद्धतीत पाण्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाचा अवलंब केलेला नाही . त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
मिलारचा वेट लॉस प्रवास
वॉटर फास्टिंग
वॉटर फास्टिंग वजन कमी करण्यास मदत करते. सोबतच कॅलरीजचे सेवन मर्यादित करते. शरीराला ऊर्जेसाठी आवश्यक असलेली चरबी जाळण्यास या डाएट प्रकाराचा फायदा होतो. तसेच वॉटर फास्टिंग हे पचनसंस्थेला आराम देते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते.
वॉटर फास्टिंगचे तोटे
वॉटर फास्टिंगचे फायदे आहेत. तसेच त्याचे तोटे देखील आहेत. डॉक्टर अशा प्रकारच्या उपोषणाचे कधीही समर्थन करत नाहीत. मिलरने 21 दिवस वॉटर फास्टिंग केले जे पूर्णपणे चुकीचे आहे. 24 ते 72 तासांचा पाण्याचा उपवास योग्य मानला जातो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
वॉटर फास्टिंगचे शरीरावर काही हानिकारक परिणाम देखील होतात. यामध्ये दीर्घकाळ अन्नाशिवाय राहणे समाविष्ट आहे, ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक तत्वांची कमतरता होते. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
मेटाबॉलिजमवर होतो परिणाम
दीर्घकाळापर्यंत वॉटर फास्टिंग केल्याने चयापचय क्रिया मंदावते. कारण शरीर ऊर्जा कमी होते आणि वॉटर फास्टिंग संपल्यानंतर जलद वजन वाढवते.
या व्यक्तीने हे फास्टिंग करु नये
मधुमेह, हृदयरोग किंवा अन्न-संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी Water Fasting चा पर्याय निवडू नये. असे केल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)