... म्हणून बॉयफ्रेंड भांडणात कधीच जिंकू शकत नाही
दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसोबत राहत असतील तर त्यांच्यामध्ये भांडण होणं स्वाभाविक आहे.
मुंबई : दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसोबत राहत असतील तर त्यांच्यामध्ये भांडण होणं स्वाभाविक आहे. अनेकदा लहान गोष्टींवर सुरू झालेले वाद भांडणाच स्वरूप घेतात. रिलेशनशीपमध्ये असताना दोघांमध्ये अशी लुटूपुटूची भांडणं झाली नाहीत तरच नवल! अनेकदा अशा वादविवादांमध्ये किंवा भांडणांमध्ये मुलांना पडती बाजू घ्यावी लागते. तुम्हांला ठाऊक आहे का? गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणामध्ये मुलं का जिंकू शकत नाही? गर्लफ्रेंडच्या या '5' इच्छा पूर्ण करताना मुलांंच्या नाकीनऊ येतात !
मुलींचं रडणं -
भांडणामध्ये मुलींकडची सारी शस्त्र काढून झाली की अनेकदा त्यांच्या डोळ्यात पाणी येते. राग अनावर झाल्यानंतरही भांडताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. पण मुलींच्या डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर आपोआपच मुलं पडती बाजू घ्यायला सुरूवात करतात.
रागावरचं नियंत्रण सुटतं
रागाच्या भरात अनेकदा मुलांचा त्यांच्यावरील नियंत्रण सुटतं. अशावेळेस मुलींची चूक असूनही त्या मुलांच्या तुलनेत मजबूत असतात. कारण त्यांच्याकडे कारण असते की त्या बोलल्या असत्या तर समोरच्या व्यक्तीचा आवाज वाढला असता. सारा मुद्दा भरकटण्याची शक्यता असते. या '४' अक्षरांवरुन नाव सुरु होणाऱ्या मुली असतात अत्यंत नखरेबाज!
बॉयफ्रेंडची चूक -
भांडणामध्ये मुलींना त्यांचा मुद्दा अधिक मजबूत करायचा असेल तर त्या बॉयफ्रेंडच्या मागील सार्या चूकांचं गणित मांडायला सुरूवात करतात. त्यामुळे अनेकदा यामुळे मुलांची बोलती बंद होते. या '5' गोष्टींंबददल खोट बोलूनही नातं मजबुत होतं
मित्रांकडे चूक सांगणे -
मुली अनेकदा बॉयफ्रेंडच्या एखाद्या चूकीचं त्यांच्या मित्रपरिवारात चर्चा करायला सुरूवात करतात. अशावेळेस मुलं काही बोलू शकत नाहीत सोबतच मित्रांसोबतही याबाबत चर्चा करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना गप्प बसावं लागत. बॉयफ्रेंडच जगणं मुश्किल करतात या '6' गर्लफ्रेंड्स !