मुंबई : अनेकदा पाण्यासोबत औषध घेणे अनेकांना जमत नाही. म्हणून दूध किंवा फळांच्या रसासोबत औषध घेण्याची सवय असते. मात्र तुम्हांलाही फळांच्या रसासोबत औषध घेण्याची सवय असेल तर थोडं थांबा. कारण ही धोक्याची घंटा आहे. कोणत्याही फळाच्या रसासोबत औषध घेणं आरोग्याला धोकादायक आहे. काही वेळेस फळाच्या रसामुळे औषध घेतल्याने त्याचा परिणाम कमी होतो. 


काय होतो परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फळांच्या रसासोबत औषध घेतल्याने अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो. त्यामुळे द्राक्ष, संत्र आणि कधीकधी सफरचंदाच्या रसासोबत औषधं घेणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 


द्राक्षाच्या रसामुळे औषधांचा रक्तामध्ये मिसळणारा परिणाम कमी करण्यास  मदत होते. यामुळे रक्तदाब कमी जास्त होणं, हृद्याची धडधड कमी, जास्त होणं असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा रूग्णांना द्राक्षाच्या रसापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. 


काय सांगते संशोधन ? 


एका संशोधनामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, संत्र, सफरचंद, द्राक्ष यांचा रस कॅन्सर किंवा अ‍ॅन्टी बायोटिक्स घटकांचा औषधामधील परिणाम कमी करण्यास मदत करतात. द्राक्षाच्या रसासोबत औषध घेतल्यास त्याचा केवळ निम्मा परिणाम शरीरात दिसतो.


औषध हे नेहमी पाण्यासोबत घेणंच अधिक सुरक्षित आहे. ग्लासभर पाण्यासोबत औषधाची गोळी घेतल्यास ते शरीरात उत्तम प्रकारे मिसळले जाते. थंड गार पाण्याने औषध घेण्याची चूक करू नका.