मुंबई : दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात. 


रात्री आंघोळ करण्याचे फायदे - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींना वाटते रात्री आंघोळ करून झोपल्याने सकाळी करावी लागणार नाही. पण हा निर्णय वैयक्तिक आहे. पण रात्री आंघोळ करण्याची सवय ही आरोग्याला फायदेशीर ठरू शकते असे एक्सपर्टचे मत आहे. 


रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने त्वचा अधिक हेल्दी होते. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करावी. दिवसभर  प्रवासादरम्यान, त्वचेवर धूळ, धूर, प्रदुषण, घाम यांचा थर बनतो. वेळीच त्वचेवरून त्यांना दूर न केल्यास त्यामधून अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. शरीर स्वच्छ आणि थंड असल्यास रात्रीची शांत झोप मिळण्यास मदत होते.  आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे


सकाळी उठल्यावरही आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते. यामुळे शरीरातील इंद्रियांना चालना मिळते. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून झोपा आणि पुन्हा सकाळची सुरूवात ताजीतवानी होण्यासाठीदेखील नियमित आंघोळ करा. टबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स


जसजसा दिवस संपतो तसे शरीराचे तापमानही खालावते. झोपेच्या अवस्थेमध्ये असताना शरीराचे तापमान हे सगळ्यात कमी असते. आंघोळीमुळे शरीरात तापमान वाढण्यासाठी मदत होते. जसे तुम्ही अंग पुसता तसा तुम्हांला हळूहळू थंडावा जाणवतो. म्हणूनच जेव्हा शरीरावर मॉईश्चरायझर नसते तेव्हा शरीरात थंडावा निर्माण होतो.  शरीर अधिक थंड आणि रिलॅक्स वाटते. 


आंघोळीनंतर शांत झोप मिळते. म्हणूनच निद्रानाशाची समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून झोपण्याचा पर्याय आजमावून पहा. 3 मिनिटांंच्या या श्वसनव्यायामांंनी झटपट मिळवा झोप