मुंबई : दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री बिछान्यात पडल्यावर शांत झोपावे असे अनेकांना वाटते. परंतू दिवसभरातील काही चूकीच्या सवयी किंवा खाण्या-पिण्याच्या सवयींमूळे रात्री थकूनही झोप येत नाही. यामुळे अनेकांना मध्यरात्री अचानक जाग येणे, झोप न येणं अशा समस्या वाढतात.
निद्रानाशाच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन हे त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बिछान्यावर पडून कुशी बदलत राहण्यापेक्षा काही श्वसनाचे व्यायाम करावेत. यामुळे झोपेला चालना देणार्या हार्मोन्सचा शरीरात प्रवाह सुधारतो. असा सल्ला आहारतज्ञ स्वाती दवे देतात.
योगा केल्याने ताण हलका होण्यास मदत होते हे सार्यांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे शरीरातील तसेच मानसिक ताणतणाव कमी झाल्यास झोप येणे सुकर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही हलकी योगासनं करा. यासोबतच श्वसनावर नियंत्रण मिळवल्यानेदेखील झोप येण्यास मदत होते. यामुळे शरीरात कार्बनडायऑक्साईड साचून राहतो आणि ताण हलका होण्यास मदत होते.
तुम्ही कसा कराल हा व्यायाम ?
पडल्या-पडल्या झोपण्यासाठी हा श्वसनाचा व्यायाम स्टेप बाय स्टेप अशाप्रकारे करा
Step 1:
उजव्या कुशीवर झोपा.
Step 2:
डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.
Step 3:
शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवा. सुरवातीच्या काळात श्वास काही सेंकंदच रोखणे शक्य होईल. हळूहळू तुम्ही 10-15 सेकंद श्वास रोखणे शक्य होईल.
Step 4:
हा प्रयोग नियमित रात्री झोपण्यापूर्वी 5-6 वेळेस करा. हळूहळू तुमच्या निद्रानाशेच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.