मुंबई  : हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साजूक तूपाबाबत आपल्याकडे अनेक समज गैरसमज आहेत. मात्र गाईचे तूप हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहेत. त्याचा आहारातील समावेश हिवाळ्याच्या दिवसात अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात वरण भात  तूप, तूप पोळी साखरेची चव नक्की चाखा.  


त्वचेचा पोत सुधारतो - 


हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्वचा  शुष्क होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मॉईश्चर कमी होते. यामुळे शरीराला कंड सुटण्याचा म्हणजेच खाज येण्याचे प्रमाण अधिक होते. 
हिवाळ्याच्या दिवसातही शरीरात डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो हे नकळत आपल्या लक्षात येत नाही. शरीरातील मॉईश्चर कमी होते. अशावेळी आहारात तूपाचा समावेश केल्यास शरीराला आतमधून हायड्रेट ठेवण्यास मदत होते.  परिणामी त्वचेलाही तजेला येतो. 


वजन आटोक्यात राहते  -  


तूप वजन आटोक्यात ठेवायला मदत करते हे वाचून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील पण हे खरं आहे. साजूक तूप म्हणजेच गाईच्या तूपाचा आहारात नेमका समावेश केल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. जंक फूड, तळकट पदार्थ हे साजूक तूपातले नसून डालडा किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलात तळलेले असतात. त्यामुळे आहारात अशा तेलकट पदार्थांचा वापर हानीकारक ठरू शकतो.  साजूक तूपातून आरोग्याला आवश्यक फॅट्स मिळतात 


शरीरात उष्णता निर्माण होते  - 


हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता राहण्यासाठी गरम कपडे, ग्लोव्ह्ज यांचा समावेश केला जातो. पण नियमित आहारात साजूक तूपाचा समावेश केल्यास नैसर्गिकरित्या शरीरात  उष्णता निर्माण होण्यास मदत होते.