मुंबई : अनेकदा तुम्ही घरी जितके खाता त्यापेक्षा लग्नात बुफे जेवणामध्ये, हॉटेल, रेस्टरॉरंटमध्ये तोच आवडीचा पदार्थ कमी प्रमाणात खाल्ला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच एक प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी जेवणामध्ये सोड्याचा वापर केला जातो. चायनीज पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी अजिनोमोटो वापरला जातो. त्यामुळे निम्मे खाल्ले तरीही लगेजच पोट भरल्यासारखे वाटते पण मन तृप्त होत नाही. पुन्हा काही वेळाने भूक होते.  
 
हॉटेल किंवा लग्नाच्या जेवणाप्रमाणे घरातही काही पदार्थ बनवताना सर्रास बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. हे मूळीच आरोग्यदायी नाही.अनेकदा बेकिंग सोडा आणि कुकींग सोडा यामधील फरक अनेकांना समजत नाही.  त्यामुळे अनेकजण नकळत बेकिंग सोड्याचा सर्रास वापर करतात. मिठायांमध्ये, गोडाच्या पदार्थामध्ये बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. एखादा पदार्थ बेक करणं किंवा आंबवणं यापुरता बेकिंग सोडा सुरक्षित आहे. पण पदार्थाचा रंग खुलवण्यासाठी किंवा वरचेवर बेकिंग सोड्याचा वापर नियमित जेवणात करणं त्रासदायक ठरू शकते. असा सल्ला  आहारतज्ञ दीपशिखा अग्रवाल यांनी दिला आहे. 


काही जण पालेभाज्या किंवा फरसबीची भाजी करताना त्यामध्ये प्रत्येक वेळेस बेकिंग सोड्याचा वापर करतात. यामुळे त्याचा हिरवा रंग टिकून राहण्यास मदत होते. गृहिणींची किंवा हॉटेलमध्येही पदार्थांना अधिक आकर्षक बनवण्याची ही ट्रिक आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. बेकिंग सोड्याच्या वापरामुळे त्या पदार्थामधील पोषक घटक कमी होतात. यामुळे व्हिटॅमिन सी, मॅग्नीज, नाइसिन यासारखे पोषक घटक कमी होतात. असा सल्ला आहारतज्ञ दीपशिखा अग्रवाल देतात.


 बेकिंग सोड्याचा वापर करून तयार केलेला कोफ्ता चटकदार होईल पण अशाप्रकारचे अन्न वारंवार घेतल्याने पोटात गॅस होण्याचा त्रास वाढू शकतो. भजी किंवा कोफ्त्यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर केल्यास तळताना त्यामध्ये तेल शोषून घेण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे फॅट्स, कोलेस्ट्रेरॉल  वाढण्याचा धोका असतो.बेकिंग सोड्याचा वापर प्रामुख्याने मिठायांमध्ये केला जातो. त्यामुळे दीपशिखाच्या सल्ल्यानुसार, आहारात बेकिंग सोड्याचा वापर कटाक्षाने टाळा. मात्र एखाद्या पदार्थांमध्ये गरज असल्यास फ्रुट सॉल्टचा वापर करा