मुंबई : खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा स्त्रीयांच्या आरोग्यासाठी खारीक चांगले असते हे तुम्ही वाचले असेल. परंतू पुरूषांच्या आरोग्यासाठीदेखील खारीक आवश्यक आहे. 


खारीक खाण्याचे आरोग्यदायी फायदे - :  


अनेकजण दूधामध्ये खारीक पावडर मिसळून पितात. यामुळे अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण होते. दूधात खारीक भिजवून खाणे आबालवृद्धांसाठी एनर्जी ड्रिंकप्रमाणे काम करते. 


नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. 


खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 


मधूमेहींसाठी खारीक गुणकारी ठरते. त्यामधील नैसर्गिक  गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.  


सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे  एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.


बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनाही खारीक फायदेशीर ठरते. यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असतात. दूधामध्ये  खारीक मिसळून प्यायल्याने त्यामधील फायबर घटक पचनक्रियेला चालना देतात. त्यामुळे नियमित दूध - खारीकाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. 


पचनाचा त्रास, डायरिया, पोटदुखी अशा समस्यांवर खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकातील पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, मिनरल्स, मॅगनीज, सेलेनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. 


हाडांना बळकटी देण्यासाठी  खारीक आणि दूध फायदेशीर आहे.  


खारीकमधील फायबर घटक कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात. 


खारीक मधील पौष्टिक गुणधर्म 


खारीकमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे त्वचेला चकाकी येण्यास मदत होते. सोबतच शरीरात नव्या पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. खारीकमध्ये नैसर्गिक स्वरूपातील साखर असल्याने गोडवा मिळवण्यासाठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.