मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे घामाच्या धारा वाहु लागल्या आहेत. अशावेळी थंड पाणी पिण्याचा मोह होतो. पण बर्फाचे थंड पाणी आरोग्यास नुकसान पोचवू शकते. कसे ते पहा...


पचनतंत्रात बिघाड-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्फाचे थंड पाणी प्यायल्याने पचनतंत्रात बिघाड होतो. कारण त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. परिणामी पचनक्रीया मंदावते आणि त्यामुळे शरीराला पोषकतत्त्व मिळत नाहीत. 


पोषकतत्त्व कमी होतात-


शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सियस असते आणि थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे अन्नाचे पचन करण्यासाठी आणि पोषकतत्त्व शरीरात शोषूण घेण्यासाठी कमी ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता जाणवते.


घसा खवखवणे-


थंड पाणी प्यायल्याने सर्दी होण्याची संभावना असते. त्याचबरोबर विविध इंफेक्शन आणि घशाची खवखव याचा धोका वाढतो.


हार्ट रेट कमी होतो-


अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, बर्फाचे पाणी वेगस तांत्रिकाला उत्तेजित करतात. वेगस 10 वी तांत्रिक कपाल आहे आणि शरीरातील ऑटोमोनस नर्व सिस्टमचा हा महत्वपूर्ण भाग आहे. ज्यामुळे अनैच्छिक क्रिया नियंत्रित होतात. वेगस नर्व्ह हार्ट रेट कमी करुन आणि बर्फाचे पाणी तांत्रिकला उत्तेजित करतात. त्यामुळे हार्ट रेट कमी होतो.