या 3 कारणांमुळे महिला लैंगिक संबंधांसाठी पतीला देतात नकार; सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा
पत्नी पतीला सेक्ससंदर्भात का नकार देतात, याबाबतची कारणंही समोर आली आहेत.
मुंबई : नुकतंच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एनएफएचएसच्या सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, भारतात पत्नीने सेक्सला नकार दिला तेव्हा पतींना काय वाटतं. शिवाय पत्नी पतीला सेक्ससंदर्भात का नकार देतात, याबाबतची कारणंही समोर आली आहेत.
या 3 कारणांमुळे महिला नकार देऊ शकतात
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये, 80 टक्के स्त्रिया म्हणतात की, थकल्या असताना सेक्स करण्यास नकार देऊ शकतात. याशिवाय पतीला लैंगिक आजार असला तरीही पत्नी सेक्स नाकारू शकते. महिलांच्या म्हणण्याप्रमाणे की, नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असले तरी पत्नी संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.
66 टक्के पुरुष हे योग्य मानतात
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये पुरुषांची विचारसरणी उघड केलीये. यामध्ये 66 टक्के भारतीय पुरुषांचं मत आहे की, जर एखादी महिला थकली असेल तर ती तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.
त्याच वेळी, या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 80 टक्के महिलांचा असा विश्वास आहे की, महिला सेक्स नाकारू शकतात. मात्र, महिलांनी यासोबत आणखी 2 कारणं दिली आहेत, ज्यामुळे ती आपल्या पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.