न्यूयॉर्क : स्मार्टफोनमुळे नक्कीच आपले आयुष्य काहीसे सहज सोपे झाले असेल. त्याचे अनेक फायदे देखील निश्चितच आहेत. पण त्याचबरोबर अनेक धोकेसुद्धा आहेत.


आत्महत्येचे वाढते प्रमाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याचे मुळ स्मार्टफोनमध्ये दडलेले आहे. जी मुले अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवतात, त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती अधिक दिसून येते, असे अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे.


काय आहे कारण ?


विश्वविद्यालयातील थॉमस जॉइनरने सांगितले की, अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवल्याने आत्महत्येची प्रवृत्ती, धोका वाढतो. तसे विचार मनात येऊ लागतात. मानसिक स्वास्थ्याशी संबंधित या गोष्टी खूप गंभीर आहे. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 
संशोधनातून असे दिसून आले आहे की, जी मुले दिवसातील ५ तासांपेक्षा अधिक काळ इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवतात, त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती ४८% अधिक दिसून येते. तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर १ तासाहून कमी वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण २८% असल्याचे समोर आले आहे.


मुलींची संख्या अधिक


जर्नल क्लिनिकल साइकोलॉजिकल साइंसमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अमेरिका सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या नुसार २०१० नंतर १३ ते १८ वयोगटातील मुलांच्या आत्महत्येत आश्चर्यकारकरीत्या वाढ झाली आहे. यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.