मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. तर शुक्रवारी एका दिवसात संपूर्ण देशभरात 1 करोड 64 हजार लोकांना लस टोचण्यात आली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्वीट करून देशवासियांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'आज देशाने एक कोटी लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. ज्यांनी लसीकरण केलं आणि ज्यांना या मोहिमेत सामील केलं त्यांचं हे यश आहे. याबद्दल अभिनंदन.


सर्वात जास्त लसीकरण उत्तर प्रदेशात


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उत्तर प्रदेसमध्ये जास्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालं आहे. यूपीमध्ये शुक्रवारी एकूण 28 लाख 62 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलं. यामध्ये कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर होतं. कर्नाटकमध्ये एकूण 10 लाख 79 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलं.


ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने दररोज 1 कोटी डोस लागू करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य शुक्रवारी पूर्ण झालं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात 14 कोटींपेक्षा जास्त लोकं आहेत ज्यांना दोन्ही डोस मिळाले आहेत.


कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुतनिक लस सध्या देशात दिल्या जात आहे. आतापर्यंत सर्वाधिक डोस कोविशील्ड या लसीचे देण्यात आलेत. देशात कोविशील्डचे 54 कोटी डोस दिले आहेत. पुढील महिन्याच्या अखेरीस, झायडस कॅडिला लस 12 वर्षांवरील सर्व लोकांना उपलब्ध होईल. सरकार प्रयत्न करत आहे की या वर्षाच्या अखेरीस लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळावेत.