Bad Dreams : तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? `या` आजाराचे आहेत हे संकेत
तुम्हालाही जर वाईट स्वप्न पडत असतील तर सावधान व्हा, अशी वाईट स्वप्न वारंवार पडणं चांगलं लक्षण नाही. तुमच्या फिटनेससाठी हे चांगलं नाही. नेमकं आम्ही का असं म्हणतोय जाणून घेऊया.
Bad Dreams : आपल्या सर्वांना कमी जास्त प्रमाणात स्वप्न पडतात ( Dreams). आपल्या विचारांमध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी अंधुक स्वरूपात किंवा विचित्र स्वरूपात आपल्याला स्वप्नांमध्ये पाहायला मिळतात ( Thoughts seen in dreams). यातील काही स्वप्न ( Happy Dreams) सुखावणारी, काही स्वप्न मजेशीर (Funny Dreams) तर काही स्वप्न खतरनाक म्हणजेच आपल्या काळजाचा थरकाप उडवणारी ( Bad dreams or nightmares) असतात. इंग्रजीमध्ये यालाच नाईटमेअर असं म्हणतात. अशी वाईट स्वप्न एकदा, दोनदा पडणं नॉर्मल मानलं जातं. मात्र तुम्हाला वारंवार वाईट स्वप्न पडत असतील असतील तर ही चिंतेची बाब आहे. आपल्याला वाईट स्वप्न पडण्यामध्ये मानसिक आणि शारीरिक कारणं असू शकतात ( Physical and mental reasons ) असं तज्ज्ञ सांगतात. यासोबतच काही मेडिकल कारणे देखील असतात. तुमच्या घरात तुम्हाला किंवा घरातील कुणालाही ही समस्या असेल, तर त्याला हलक्यात न घेतलेलं बरं. कारण अनेकदा तुम्हाला पडणारी वाईट स्वप्नं ही मेडिकल डीसऑर्डरमुळे पडत असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात याच समस्येबाबत.
वाईट स्वप्न (Reasons of Bad Dream) पाडण्यामागील कारणं जाणून घ्या
सर्वसाधारणपणे वाईट स्वप्न ही रात्रीच्या वेळेत पडतात. वाईट स्वप्न एखाद्या विशिष्ट वेळेततच पडतात असं काही नाही. ही स्वप्न तुम्हाला एकापेक्षा अधिकवेळा पडू शकतात. वाईट स्वप्न पडल्याने याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर ( Bad Dreams and impact on Sleep) तर होतोच, सोबतच तुमच्या मेंदूवर देखील होत असतो. माणसाला वयाच्या कोणत्याही वर्षी अशी वाईट स्वप्न पडू शकतात. याने त्या व्यक्तीला तणावात असल्याचं ( Tension ) वाटू शकतं. अशी स्वप्न पडल्यावर भीती वाटते, भीतीने ( Fear) अनेकांना जाग देखील येते. अनेकदा वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर अनेकांना रात्री झोपूच नये असं देखील वाटतं. वारंवार असं झाल्याने स्वभाव चिडचिडा ( Cranky mood) होतो. यामुळे नंतरचा पूर्ण दिवस तुम्हाला थकवा ( Tiredness) जाणवतो.
तुम्ही दिवसा एखादी भीतीदायक गोष्ट पहिली की त्या घटनेचे पडसाद ( impact of bad things on mind) तुमच्या मनात घर करतात. अशा घटनांचा तुमच्या मेंदूवर आणि मनावर परिणाम होत असतो. ज्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही एखादा होणार हॉरर सिनेमा पाहिला किंवा मोठा अपघात डोळ्यांदेखत पाहिला तर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडू शकतात. अनेकदा दिवसभर डोक्यात वाईट ( Bad thoughts results in bad dreams) विचार येत असतील तर रात्री तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात. याशिवाय, तुम्हाला जर पॅरासोम्निया ( Parasomnia ) असेल तरीही तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला रात्री झोपण्यास त्रास होतो.
यावर इलाज काय ? ( Treatment to get rid of bad dreams )
यापासून स्वतःची सुटका करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे मेडिटेशन ( Meditation ). रात्री झोपण्याआधी मेडिटेशन कडून झोपाल तर तुम्ही या त्रासापासून स्वतःची सुटका करवून घेऊ शकतात. याशिवाय मानसोपचारतज्ज्ञ मन शांत (peace of mind) ठेवण्याचा सल्ला देतात. सध्याच्या पिढीत अल्कोहोल किंवा कॅफिन ( reduce alchohole and caffeine consumption) सेवनाचं प्रमाण वाढलं आहे. अशात वाईट स्वप्नांच्या त्रासापासून निवारण करण्यासाठी अशा गोष्टींचं सेवन कमी केलं पाहिजे.
Recurring Nightmares or bad dreams causes treatments and more