हिवाळ्यात `हे` 5 पदार्थ खा, Bad Cholesterol होईल दूर
Bad Cholesterol Diet : काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाची काळजी घेतात. त्यामुळे जाणून घेऊयात, हे कोणते पदार्थ आहेत ते.
Bad Cholesterol Diet : हिवाळ्यात आपल्याला खुप भूक लागत असते. या भूकेपायी आपण हाताला मिळेत ते खात असतो. मग तो गरमा गरम पकोडे असो अथवा भजीया असो. याचा शरीरावर काय परिणाम होईल, याचा अजिबात विचार करत नाही. या तुमच्या खाण्याच्या सवयी कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्याचवेळी जर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी आधीच वाढली असेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खुप महत्वाचे आहे. या कोणत्या गोष्टी असणार आहेत, हे जाणून घेऊयात.
काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी करतात आणि हृदयाची काळजी घेतात. त्यामुळे जाणून घेऊयात, हे कोणते पदार्थ आहेत ते.
ओट्स
फायबर युक्त ओट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी करण्यास खुप मदत करते. ओट्स शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. तसेच हे वजन वाढण्यास प्रतिबंध करते आणि अशा प्रकारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
हिरव्या भाज्या
आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर असते जे शरीराला कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) शोषून घेण्यापासून रोखते ज्यामुळे ते रक्तापर्यंत पोहोचत नाही. याशिवाय फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे वजनही कमी होते.
केळी खा
केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे संतुलन राहते, वारंवार भूक लागत नाही आणि शरीरात कोलेस्टेरॉलचा (Bad Cholesterol) प्रसार होण्यास प्रतिबंध होतो.
लसून
लसणात अॅलिसिन आढळते, हा एक प्रकारचा बायोएक्टिव्ह घटक आहे जो रक्तातील कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढवणारे घटक कमी करण्यास मदत करतो. लसणाची एक कढीही रोज खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. यात कॅटेचिन असते जे कोलेस्ट्रॉलचा (Bad Cholesterol) प्रभाव कमी करते. ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)