Green Tea Overdose Effects: ग्रीनटीने वजन कमी होते आणि त्यामुळे आपणही आपला लठ्ठपणा कमी व्हावा म्हणून आपण ग्रीनटीचे सेवन करतो. ग्रीनटीचे महत्त्व आपल्याला जाहिरातीतून नाहीतर समाजमाध्यमांवरून आपल्यापर्यंत पोहचतं असते. परंतु काही जण हे कुठल्याही डायटिशेनच्या सल्ल्याशिवाय ग्रीनटी पिण्याचा अतिरेक करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या फिटनेससाठी अधिकतर लोकं हे ग्रीनटीचे अतिसेवन करतात. खरंतर ग्रीन टीच्या मदतीने वाढते वजन कमी करता येते आणि त्याच वेळी रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. ग्रीन टी नियमितपणे प्यायल्याने केसांची चमक टिकून राहते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाही असे म्हणतात. ग्रीन टीच्या बाबतीतही असेच आहे. 


काय आहेत ग्रीन टीचे तोटे? 
कुठल्याही गोष्टीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. जर तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर पोटात जळजळ होणे, पेटका येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ग्रीनटी जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटात अॅसिड तयार होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे डायरियाचा धोकाही निर्माण होतो. 


कोणी टाळावा?
ज्यांना बोवेल सिंड्रोमचा आहे त्यांनी ग्रीन टी अजिबात पिऊ नये. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते कारण त्यात असलेल्या कॅफिनमुळे मायग्रेनचा आजार होऊ शकतो. तुम्हालाही कॅफिनची ऍलर्जी असल्यास ग्रीन टी अजिबात पिऊ नका. 


ग्रीन टीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे झोप कमी होऊ शकते. ज्यांना insomania आहे त्यांनी ग्रीन टी पिऊ नये.


ज्यांना बद्धकोष्ठतेच्या तक्रारी आहेत त्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. साधारणपणे दिवसातून ३ ते ४ कप ग्रीन टी पुरेसा असतो.