इतर महिलांसोबत पतीचं Physical Relation असेल तर...; नेमका काय विचार करतात महिला?
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Rejection of sex : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. NFHS च्या सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, देशातील 45% स्त्रिया असं मानतात की, पत्नीने आपली कर्तव्यं नीट पार पाडली नाहीत तर कौटुंबिक हिंसाचार हा त्यांच्यासाठी वैध आहे. तर दुसरीकडे नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असेल तर पत्नी या कारणाने पतीला सेक्ससाठी नकार देऊ शकते, असं मत महिलांनी नोंदवलंय.
66 टक्के पुरुष हे योग्य मानतात
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये पुरुषांची विचारसरणी उघड केलीये. यामध्ये 66 टक्के भारतीय पुरुषांचं मत आहे की, जर एखादी महिला थकली असेल तर ती तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.
त्याच वेळी, या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 80 टक्के महिलांचा असा विश्वास आहे की, महिला सेक्स नाकारू शकतात. मात्र, महिलांनी यासोबत आणखी 2 कारणं दिली आहेत, ज्यामुळे ती आपल्या पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.
या 3 कारणांमुळे महिला नकार देऊ शकतात
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये, 80 टक्के स्त्रिया म्हणतात की, थकल्या असताना सेक्स करण्यास नकार देऊ शकतात. याशिवाय पतीला लैंगिक आजार असला तरीही पत्नी सेक्स नाकारू शकते. महिलांच्या म्हणण्याप्रमाणे की, नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असले तरी पत्नी संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते.
उत्तर भारतात हरियाणा, पंजाबच्या पुढे
एनएफएचएसच्या आकडेवारीनुसार उत्तर भारतीयांची सेक्स लाईफ ही दक्षिण भारतापेक्षा अधिक संतृष्ट आहे. हरियाणा, पंजाब, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगालमध्ये केलेल्या सर्व्हेक्शनात पहिल्या ४ आठवड्यांच्या अनुभवाबाबत विचारण्यात आले. लाईव्ह मिंटमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, ५५ टक्के महिला आणि पुरूषांचे म्हणने होते की, ४ आठवड्यात त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. मध्य प्रदेश आणि राजस्तानमध्येही ही टक्केवारी अधिक होती. हेच प्रमाण राष्ट्रीय स्तरावर पाहिले तर, ४७ टक्के पुरूष तर, ४८ टक्के महिला आठवड्यातून चार वेळा शारीरिक संबंध ठेवतात.