`या` 10 चुका तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करतात, त्या आताच सुधारा
नात्यात या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.
मुंबई : आपण हे बऱ्याचदा ऐकलं असेल की, माणूस आहे तो आणि तो चुकतो देखील. परंतु एकदा झालेली चुक ही चुक असते. परंतु तिच तिच गोष्ट तुम्ही सारखी सारखी करात, तर ती चुक नाही तर जाणून बुझून केलेली गोष्ट मानली जाते. अशाच चुका बऱ्याचदा माणसांकडून आपल्या नात्यात घडतात. ज्यामुळे नातं टिकवणं खूप कठीण होतं. बऱ्याच नवरा-बायकोंमध्ये किंवा जोडिदारांमध्ये अशाच चुकांमुळे वाद सुरु होतो आणि हा वाद नातं संपवण्याकडे जातो.
वैवाहिक जीवन विशेषत: आपल्या बरोबर अनेक आव्हाने घेऊन येते. याचा परिणाम फक्त त्या दोघांवर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आणि मुलांवरही होतो.
त्यामुळे नात्यात कधीही या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.
1. इतरांचे हस्तक्षेप करणे
अनेकदा विवाहित लोक इतरांना त्यांच्या नात्यात प्रवेश करण्याची किंवा बोलण्याची संधी देतात. परंतु हे लक्ष द्या की, तुमचा जवळचा मित्र असो किंवा भावंडं असो, तुमच्या वैवाहिक जीवनात बाहेरच्या व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका. यामुळे गोष्टी अधिक गुंतत जाता. तुमचं नातं तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांपेक्षा जास्त चांगलं कोणीही समजू शकत नाही.
2. चुका एकमेकांवर लादणे
आपल्या चुका मान्य न केल्याने, समोरच्या व्यक्तीला फक्त दोष दिल्याने नाते घट्ट होत नाही, तर बिघडते. तसेच, माफ करण्याचे नाटक केल्याने देखील तुमच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशावेळी चुकी माना किंवा समोरच्याची चुकी एक्सेप्ट करा आणि पुढे जा.
3. इच्छा शेअर न करणे
तुम्हाला काय हवं आहे ते तुमच्या जोडीदाराला स्पष्टपणे सांगायला शिका. तो प्रसंग निघूल गेल्यावर मला हे हवं होतं असं म्हणून त्याच्यावर रागवू नका. तुमच्या इच्छा तुम्ही जोडीदाराला सांगाल तरच त्याला तुमच्याबद्दल कळेल. शांत बसुन काहीही होणार नाही.
4. प्रत्येक गोष्टीत आनंदी मानने
वैवाहिक जीवनाची ही एक मोठी चूक आहे की, सुरुवातीच्या काळात जोडीदार प्रत्येक गोष्टीत आनंदी होतो पण नंतर त्यांच्याकडे उणीवा मोजण्याशिवाय काहीच उरत नाही. सुरुवातीपासूनच तुमच्या जोडीदाराशी गोष्टींवर चर्चा करायला शिका. त्यामुळे पुढे होणारे वाद टाळता येतील.
5. तुमच्या जोडीदाराला गृहीत धरणे
तुम्ही दोघे विवाहित आहात म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहीत धराल असे होत नाही. त्यामुळे त्याला काय वाटतंय? त्याचं कुठल्याही गोष्टीवर मत काय आहे हे लक्षात घ्या आणि त्यावर तोडगा काढूनच पुढे जा.
6. आदर न करणे
तुम्ही पुरुष असो किंवा स्त्री, तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केलाच पाहिजे. आदर हा शब्द म्हटल्याने आदर मिळत नाही, तर तुमचा आदर तुमच्या हावभावातून आणि तुमच्या वागण्यातून दिसला पाहिजे.
7. स्वत:चंच मत खरं मानने
अनेक वेळा नवरा-बायको एकमेकांशी भांडू लागतात कारण त्यांचं मत एका गोष्टीसाठी वेगवेगळं असतं. परंतु प्रत्येक वेळी मी बरोबर असं मनात धरु नका. समोरचा असं का बोलतोय, त्याची बाजू देखील लक्षात घ्या
8. पैशांची चर्चा न करणे
अनेक वेळा पती-पत्नी एकमेकांशी पैशांबाबत चर्चा करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होतो. घराचा आणि वैयक्तिक खर्चाचा एकत्रित हिशोब केला नाही, तर कुठे खर्च करायचा किंवा भविष्यात काय करायचे याचा ताळमेळ बिघडतो. ज्यामुळे दोघांमध्ये भांडणं होतात.
9. त्रास लपवणे
समस्या लपवल्याने ती संपत नाही. यामुळे तुम्हा मनात काहीही असलं तरी ते एकमेकांसोबत शेअर करा. तुमच्या जोडीदाराला देखील समजून घेऊ द्या की, तुमच्या मनात किंवा जीवनात नक्की काय सुरु आहे.
10. एकमेकांना समजून न घेणे
जर पती-पत्नी एकमेकांना समजून घेत नसतील, तर त्यांच्यातील समजूतदारपणा संपेल, जो तुम्हाला वेळोवेळी जाणवेल. कालांतराने हेच दोघांमधील प्रेम कमी होण्यासाठी कारणीभूत ठरते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)