मुंबई : प्रत्येक पुरुषाला एक चांगली स्त्री जोडीदार हवी असते जिच्यासोबत तो संपूर्ण आयुष्य घालवू शकतो. कोणत्याही नात्यात दोघांनाही एकमेकांची काळजी घ्यावी लागते, एक व्यक्ती दुसऱ्याला जास्त इरिटेट असेल तर भांडण होण्याची शक्यता वाढते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांच्या जोडीदाराला आवडत नाहीत याविषयी आपण अनेकदा बोलतो. पण आज आपण हेच पाहणार आहोत की मुलीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रियकर किंवा पतीला आवडत नाहीत आणि ज्यामुळे वाद वाढतात.


महिला पार्टनरच्या या सवयी पुरुषांना आवडत नाहीत


तयार होण्यासाठी बराच वेळ 


मुलींना तयार होण्यासाठी मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो यात शंका नाही. पण बऱ्याच वेळानंतर महिला जोडीदारांना पार्टी किंवा कोणत्याही प्रसंगासाठी तयार होण्यासाठी बराच वेळ लागतो. मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या असते, त्यामुळे वेळेवर घरातून बाहेर पडणं आवश्यक असतं. परंतु महिलांना होणाऱ्या उशीरामुळे आपण वेळेवर कोणत्याही ठिकाणी पोहोचू शकत नाही. 


शॉपिंगमध्ये जास्त वेळ 


प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा मेल पार्टनरने तिला शॉपिंगमध्ये मदत करावी. यात काहीही वाईट नाही कारण असं केल्याने एकमेकांमधील नाते अधिक घट्ट होतं. पण जेव्हा मुली कोणताही ड्रेस किंवा वस्तू यांच्या शॉपिंगसाठी वेल लावतात तेव्हा मुलांना बसून रहावं लागतं. ही गोष्ट मुलांना आवडत नाही. पुढच्या वेळी ते एकत्र खरेदी करण्यास टाळाटाळ करतात कारण त्यांना असा त्रास नको असतो.


गरजेपेक्षा अधिक शंका घेणं


शंका हे कोणतंही नातं कमकुवत करू शकतं, असं नाही की पुरुष आपल्या महिला जोडीदारावर संशय घेत नाहीत, परंतु काही वेळा महिला या कामात पुरुषांना मागे टाकतात. उशीर झाल्याबद्दल जर प्रश्न केला तर फोन उशीरा का उचलला? पुष्कळ वेळा पुरूषांना अवाजवी चौकशी करणं आवडत नाही. जर तुम्ही तुमच्या पती किंवा प्रियकरावर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर नात्यात दुरावा निर्माण होईल.